LED
LED 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर स्मार्ट सिटी उजळवण्यासाठी कर्नाटकची कंपनी इच्छुक 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : महाराष्ट्रातील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी सोलापूरला एलईडी दिव्यांच्या झगमगाटाने उजळविण्यासाठी कर्नाटकच्या वीज महामंडळाने उत्सुकता दर्शविली आहे. या कंपनीसह राज्यातील तीन कंपन्यांनी निविदा दाखल केली आहे. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केवळ एबीडी एरिया नव्हे तर हद्दवाढीसह संपूर्ण शहर एलईडी दिव्यांनी उजळणार आहे. तब्बल 45 हजार दिव्यांचा आराखडा त्यासाठी तयार करण्यात आला आहे. सध्या असलेल्या हायमास्ट दिव्यांसाठी विजेचा मोठा खर्च होतो. देखभालीवर होणाऱ्या खर्चाचे प्रमाणही मोठे आहे. सध्या पथदिव्यांच्या वीज बिलापोटी प्रत्येक महिन्याला एक ते दीड कोटी रुपये खर्च होतात. तर देखभालीसाठी वर्षाला फक्त साहित्यावर एक कोटी रुपये खर्च होतात. एलईडी लावल्यानंतर या खर्चात तब्बल 50 टक्‍क्‍यांनी कपात होणार आहे. 

काही वर्षांपूर्वी पत्रा तालीम, कसबा परिसरात एलईडी लावण्याचा प्रयोग झाला होता. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील एका विभागातही एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. काही स्मशानभूमीतही ही सुविधा आहे. मात्र, संपूर्ण शहर एलईडीमय झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवरून फिरताना आपण खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीत फिरत असल्याचा अनुभव नागरिकांना येणार आहे. 

या कामासाठी यापूर्वी तीनदा निविदा काढण्यात आल्या होत्या. आता काढण्यात आलेल्या निविदेनंतर चार कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एलईडी दिवे बसविण्यात येणार असल्याने सध्याचे पोल काढणे किंवा दुरुस्तीचे काम करण्याबाबत चालढकल होते. या पार्श्‍वभूमीवर या निविदा मंजूर करून तातडीने काम सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. 

या कंपन्यांनी दाखल केल्या निविदा 
- कर्नाटक स्टेट इलेक्‍ट्रॉनिक डेव्हलपमेंट कार्पोरेशन 
- श्री इलेक्‍ट्रिकल्स 
- ई स्मार्ट सोल्युशन एनर्जी प्रा. लि. 
- विन वॉक लिमिटेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT