Liquor sales in this city will remain closed until May 17 
पश्चिम महाराष्ट्र

या शहरात मद्यविक्री 17 मे पर्यंतच बंद राहणार

सकाळवृत्तसेवा

तासगाव : तासगाव  (जि. सांगली) शहरात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय झाला असला तरी देशी आणि विदेशी दारू दुकानांना बाजारपेठेत असल्याचा फटका बसला आहे. "पूर्ण तयारी' करूनही शहरात मद्याविक्रीला परवानगी नसल्याने शौकिनांची निराशा झाली आहे. 
लॉकडाऊनमध्ये काही दिलासा मिळाला असला तरी तासगाव शहरातील दुकाने मात्र बंदच राहणार आहेत. बाजारपेठ, शॉपिंग सेंटर, गर्दीच्या ठिकाणची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असल्याने शहरातील बहुतांश दुकाने आजही बंदच होती. 

दरम्यान, अन्य शहराप्रमाणे काही नियम तयार करून दुकाने सुरू करावीत. ठराविक दिवस ठराविक दुकानांना परवानगी मिळावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. पालिका प्रशासनाने मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, बाजारपेठेत असल्याचा फटका तालुक्‍यात एकमेव असलेल्या संगम वाईन शॉप आणि शहरातील देशी दारू दुकानांना बसला आहे. आज वाईन शॉप सुरू होणार म्हणून सकाळपासून शौकिनांनी चांगलीच गर्दी केली. गर्दी इतकी झाली, की बसस्थानक चौक जॅम झाला. लांबवर रांग लागली होती. खरेदी करणाऱ्यापेक्षा रांग पाहण्यास आलेल्यांची गर्दी जास्त झाली होती. शेवटी पालिका प्रशासन आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दुकान सुरू होते न होते तोच बाजारपेठेत असल्याचे कारण देत उत्पादन शुल्क विभागाने दुकान बंद केले.

शहरातील देशी दारूची दुकानही लॉकडाऊन काळात सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे शॉकिनांची मात्र प्रचंड निराशा झाली. तालुक्‍यातील ग्रामीण भागातील देशी दारू दुकाने मात्र सुरू असल्याने तळीरामानी ग्रामीण भागात मोर्चा वळवला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त ३० मंडळांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट

Asian Games 2026 Kabaddi : भारतीय पुरुष संघाचा दणदणीत विजय; गतविजेत्यांची दक्षिण कोरियावर ६३-३१ अशी मात

SCROLL FOR NEXT