सोलापूर : सध्याच्या स्पर्धेच्या व महागाईच्या काळात 25 हजार रुपयांमध्ये उद्योग सुरु करणे कठीण आहे. त्यामुळे शासनाच्या बीज भांडवल योजनेंतर्गत थेट कर्जवाटपाची मर्यादा एक लाखांपर्यंत करण्याचा ठराव महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाने केला आहे. तो मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सांगितले.
बिज भांडवल योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्याकरिता केंद्राकडून 40 कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून आणखी 92 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या हमीची गरज आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून तब्बल 11 हजार कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. त्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत केंद्र सरकारकडून मिळालेले 40 कोटी रुपये वाटप केले जातील. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे सध्या 500 कोटी रुपयांचे भागभांडवल असून राज्य सरकारने आणखी 500 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणही मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे श्री. सरवदे यांनी यावेळी सांगितले.
10 जुलै 1978 रोजी स्थापन झालेल्या महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या 40 वर्षाच्या कालावधीत 20.50 लाख लाभार्थ्यांना तब्बल 974 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. मात्र, कर्ज घेतलेल्यांनी सुरु केलेल्या उद्योगाची स्थिती, कर्जदारांचा आर्थिकस्तर उंचावला का, कर्जाचा उद्देश सफल झाला का, कर्ज रकमेचा वापर कोणत्या कारणासाठी केला या सर्व बाबींची पडताळणी केली जाणार आहे.
- राजाभाऊ सरवदे, अध्यक्ष, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.