पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : मी सर्वसामान्यांचा कार्यकर्ता : राजू शेट्टी

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - मी कोणत्याही आघाडीचा नाही किंवा नव्हतो. मी सर्वसामान्य लोकांचा, शेतकऱ्यांचा नेता आणि कार्यकर्ता म्हणून हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्यासाठी लोकांना मी बोलावले नाही तर ते स्वत:हून आले. हीच माझ्या यशाची पहिली पायरी असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी येथे सांगितले. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार संपतराव पवार - पाटील व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे योगेंद्र यादव यांच्या उपस्थितीत बैलगाडीतून आलेल्या शेट्टी यांनी शक्तिप्रदर्शन केले. प्रा. जालंदर पाटील यांनी डमी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर काम पाहत आहेत. 

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी आघाडीतर्फे हातकणंगलेमधून श्री. शेट्टी यांचा अर्ज दाखल करण्यात आला. दसरा चौकातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी आले. बैलगाडीतून आलेल्या शेट्टी यांच्यासह इतर नेत्यांना जिल्हाधिकारी कार्यालयापासून शंभर मीटरवर उद्योग भवनजवळ थांबविण्यात आले. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास माजी मंत्री जयवंतराव पाटील, खासदार महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार संपतराव पवार- पाटील, तसेच योगेंद्र यादव जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवार आणि त्यांच्यासोबत चार, अशा एकूण पाच जणांनाच प्रवेश दिला. पावणेदोनच्या सुमारास अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर अर्धा तासाने सर्व नेते कार्यालयातून बाहेर पडले. 
शेट्टी म्हणाले, ‘‘शेतकरी स्वत:चे पैसे खर्च करून आले आहेत. आपण संघर्ष करत राहिलो आणि येथून पुढेही करत राहू. सध्या मी कोणत्या आघाडीत आहे, हे महत्त्वाचे नाही. कोणत्याही आघाडीत राहिलो तरी माझी भूमिका मात्र शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच असणार आहे.’’ 

शेट्टींवर १५ गुन्हे 
ऊस, दूध, कापूस दरासाठी केलेल्या आंदोलनामुळे झालेल्या शासकीय नुकसानीबद्दल, जमाव बंदी असतानाही कार्यकर्त्यांची केलेली गर्दी किंवा घेतलेल्या सभा अशा राज्यातील विविध पोलिस ठाण्यात श्री. शेट्टींविरोधात १५ गुन्हे दाखल आहेत. पैकी एकाही गुन्ह्यात त्यांना शिक्षा झालेली नाही, असे शेट्टी यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT