पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडणे अमान्य

सकाळवृत्तसेवा

सांगली - सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडणे आम्हाला कदापि मान्य नाही. त्यांना जागा देऊ नये, यासाठी आमचा विरोध राहील. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असून शंभर टक्के जागा काँग्रेसला मिळेल, असा विश्‍वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

ते म्हणाले, "" सांगलीची जागा स्वाभिमानीला देण्याबाबत आमचा विरोध राहील. स्वाभिमानीला जागा न देण्यास नेत्यांना भाग पाडले जाईल. महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू आहे. सर्वांपेक्षा मी वयाने श्रेष्ठ आहे. त्यामुळे ते ऐकतील. जिल्ह्यात कॉंग्रेसचे वातावरण चांगले आहे. जागा कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही. राज्यात ठराविक जिल्ह्यात जागा वाटपाबाबत घोटाळे झाले आहेत. परंतू सांगलीची जागा शंभर टक्के कॉंग्रेसकडेच राहील. जागा कोणाला दिली जाणार नाही. इथे कॉंग्रेसची मोठी परंपरा आहे. ती नष्ट करण्याचा नेत्यांनी प्रयत्न करू नये.'' 

काँग्रेसमधील युवा नेत्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत छेडले असता ते म्हणाले, ""युवा नेत्यामधील वाद थांबवला जाईल. वाद अद्याप प्रखरपणे उघड नाही. काही मंडळींनी वादात भर घातली आहे. परंतू त्याकडे नेत्यांनी दुर्लक्ष करावे. कोणीतरी सांगतात म्हणून हा वाद सुरू आहे. परंतू शंभर टक्के वाद मिटवला जाईल. त्यांचे ऐकून घेतले आहे. आता ते माझे ऐकतील.'' 

राज्यातील काही राजकीय घराणी भाजपमध्ये गेल्याबद्दल ते म्हणाले, ""कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील मोठी घराणी भाजपमध्ये गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझी विनंती आहे, कोणीही पक्षांतर करून भाजपमध्ये जाऊ नये. आतापर्यंत आपल्या जिल्ह्यातील कोणी तिकडे गेले नाही. परंतू पक्ष बदलाचे वारे आपल्याकडे येते काय? अशी चिंता वाटत होती. परंतू आता बहुतेक कोणी जाणार नाही असे चित्र आहे.'' 

काँग्रेस उमेदवार निवडून आणू 
जिल्ह्यात कॉंग्रेसकडे लढण्यासाठी उमेदवार आहे. वातावरण चांगले आहे. जोरात टक्कर देऊन उमेदवार निवडून आणला जाईल असेही आमदार कदम म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT