Uttamprakash-Khandare
Uttamprakash-Khandare 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : अर्ज भरताना तरी 'युती की जय हो' म्हणा

तात्या लांडगे

सोलापूर - भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी १९९३च्या पोटनिवडणुकीत आणि १९९५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोलाची मदत केली होती. त्यामुळे अनेकांना आमदारकीची संधी मिळाली. आता २०१९च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदाची संधी मिळावी याकरिता हेवेदावे, मान-अपमान बाजूला सारून भाजपच्या मेळाव्याला हजर राहा, असे आदेश ‘मातोश्री’वरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी सांगितले.

सोलापूर लोकसभा निवडणूक ही तिरंगी होणार असून भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींना निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असेही ठाकरे यांनी सूचना केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत उद्या (सोमवारी) हेरिटेज येथे भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांचा दुपारी दोन वाजता मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी भाजपचे उमेदवार डॉ. महास्वामी यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, रघुनाथ कुलकर्णी, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख महेश कोठे, शहरप्रमुख हरिभाऊ चौगुले, भाजपचे जिल्हाप्रमुख शहाजी पवार, शहरप्रमुख प्रा. अशोक निंबर्गी आदी उपस्थित राहणार आहेत.

उत्तमप्रकाश खंदारे भरणार पूरक अर्ज
भाजप-शिवसेना युतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी उद्या (सोमवारी) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र, आगामी काळात काही अडचण निर्माण झाल्यास त्यांना पूरक म्हणून शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे हे अर्ज भरणार आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपल्याला अर्ज भरण्यास सांगितल्याचे खंदारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर होईना
युतीच्या मेळाव्यासाठी भाजपकडून शिवसेनेच्या काही निवडक नेत्यांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच उमेदवार निश्‍चित करण्यापूर्वी अथवा झाल्यानंतरही शिवसेनेच्या ठराविक पदाधिकाऱ्यांशीच भाजप नेत्यांनी संपर्क साधल्याने जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी नाराजी व्यक्‍त केली. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार युतीच्या उमेदवारासाठी काम करेन, परंतु भाजपने दुजाभाव थांबवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT