markswadi communist party
markswadi communist party 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : माकपची तटस्थता भाजपच्या पथ्यावर?

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर  - लोकसभा निवडणुकीत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. आज ना उद्या पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे माकपचे राज्य सचिव नरसय्या आडम (मास्तर) यांनी जाहीर केले असले, तरी नेमका कोणता निर्णय घ्यायचा, याचा तिढा पक्षांतर्गत बैठकांत सुटला नसल्याने लोकसभा निवडणुकीत माकप तटस्थ भूमिका घेणार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे. मात्र, माकपची ही तटस्थता भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

जानेवारी महिन्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात मोदींबरोबर व्यासपीठावर बसून, मोदींची स्तुती करणे श्री. आडम यांना भोवले. त्यांना माकपच्या केंद्रीय समितीने तीन महिने केंद्रीय समितीच्या बैठकांमधून पदच्युत केले. त्यानंतर श्री. आडम यांनी भाजपच्या विरोधात मोर्चे-आंदोलनांतून रान उठवायला सुरवात केली. कुठल्याही परिस्थितीत जातीयवादी पक्षाला माकप पाठिंबा देणार नसून, धर्मनिरपेक्ष पक्षामागे ताकद लावणार असल्याचे सांगितले जाते; मात्र भावी विधानसभा निवडणुकीत माकपला अपेक्षित धर्मनिरपेक्ष पक्ष असलेल्या काँग्रेसने शहर मध्यची जागा सोडल्यास लोकसभेसाठी माकपची साथ काँग्रेसला मिळेल, असा प्रस्ताव मास्तरांनी ठेवला होता. मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांनी कुठल्याही परिस्थितीत शहर मध्यची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. मग माकपचा एक धर्मनिरपेक्ष पक्ष (काँग्रेस) माकपच्या यादीतून गळाला.

वंचित बहुजन आघाडीशी राष्ट्रीय स्तरावर माकपची बोलणी न झाल्याने तसेच माकपच्या लेखी जातीयवादी असलेल्या एमआयएमचा लोकसभेचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा असल्याने ॲड. प्रकाश आंबेडकर यांना माकप साथ देणार नाही, हेही तितकेच खरे. तसेच बहुजन पक्षाच्या मायावती यांच्याशी केंद्रीय स्तरावर बोलणी न झाल्याने सोलापुरात बसपलाही माकपची साथ मिळणार नाही, हेही स्पष्ट होते. मग पाठिंबा देणार तरी कोणाला, असा प्रश्‍न माकपलाच पडला आहे. त्यामुळे आज ना उद्या तटस्थच राहण्याचा निर्णय माकपला घ्यावा लागेल अन्‌ मास्तर सांगेल ती आज्ञा मानणाऱ्या अशिक्षित, धार्मिक व श्रद्धाळू कामगार वर्गाची मते आपसूकच भाजपच्या जयसिद्धेश्‍वर महाराजांना मिळतील, असा तर्क लावल्यास अतिशयोक्तीचा ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT