Solapur
Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : सोलापुरात भगव्या, निळ्या, हिरव्या रंगावर निवडणूक

प्रमोद बोडके

सोलापूर  - देशातील उत्सवप्रिय व सर्व जाती-धर्मांना घेऊन गुण्यागोविंदाने राहणारे सोलापूर शहर आज जातीच्या नावावर आक्रमक होऊ लागले आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विकासाचा मुद्दा गायब झाला आहे. भाजपने डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींच्या माध्यमातून लिंगायत कार्ड वापरले आहे. वंचित आघाडीच्या माध्यमातून ॲड. प्रकाश आंबेडकर दलित-मुस्लिम मतांची बेरीज करत आहेत. या दोन्ही उमेदवारांमुळे सोलापूरची लोकसभा निवडणूक यंदा प्रथमच भगव्या, निळ्या आणि हिरव्या रंगावर होऊ लागली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची ताकद सर्वाधिक आहे. या ताकदीला विकासाची व मोदी लाटेची जोड देण्यासाठी भाजपने महास्वामींना मैदानात उतरविले आहे. सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्‍वर नाव देण्याची मागणी राज्य सरकारने धुडकावल्याने लिंगायत समाजाची नाराजी महास्वामींच्या उमेदवारीतून दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

धार्मिक अधिष्ठान असलेल्या पद्मशाली समाजाला महास्वामी व भाजपच्या माध्यमातून साद घालण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. महास्वामींमुळे सोलापूरच्या निवडणुकीत भगवा रंग आक्रमक झाला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात एमआयएमने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतल्याने येथील एमआयएमच्या ताकदीला दलित मतांची जोड देऊन सोलापूरमार्गे दिल्लीला जाण्यासाठी ॲड. आंबेडकर सोलापुरात आले आहेत. आंबेडकरांची सोलापुरात एन्ट्री झाल्याने भावनिक मुद्याच्या माध्यमातून त्यांनी दलित-मुस्लिम व्होट बॅंकेला जवळ केले आहे. महास्वामी-आंबेडकर यांच्या उमेदवारीने कोणता समाज कोणासोबत जाईल याचीच चर्चा आता सोलापुरात होऊ लागली आहे. आपल्या नेत्यासाठी सोलापुरातील प्रमुख जाती आक्रमक होऊ लागल्याने हा मतदारसंघ सर्वसाधारण असताना जेवढी चुरस नव्हती तेवढी चुरस यंदा निर्माण झाली आहे.

अपयश झाकण्यासाठी जातीचे रंग
२०१४ च्या प्रचार सभेत नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी त्यांनी देशातील सैन्यासाठी सोलापुरातून गणवेश का शिवून घेतले नाहीत, शिंदेंनी सोलापूरसाठी काय केले? असे म्हणत ही निवडणूक जिंकली. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी सोलापूरच्या वस्त्रोद्योगासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत. स्मार्ट सिटी ठराविक भागात राबविली जात आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचा व रोजगाराचा प्रश्‍न आजही कायम आहे. मोदींनी जो उमेदवार दिला होता (शरद बनसोडे) त्या उमेदवाराला सोलापूरकरांनी २०१४ मध्ये खासदार केले. गेल्या पाच वर्षांतील खासदाराची निष्क्रियता व भाजपचे अपयश झाकण्यासाठीच सोलापूरच्या निवडणुकीत जातीचे रंग भरल्याचा आरोप होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT