banjo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बॅंडवाल्यांचाच वाजला बाजा ; कोरोनाच्या धास्तीने विवाह सोहळे रद्द...

स्वप्नील पवार

देवराष्ट्रे (सांगली)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसोहळे, जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम, विवाह व नंतर होणारे स्वागत सोहळे आदी रद्द करण्यात आले आहेत. मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने बॅंड कलाकारांसाठी खूप महत्वाचे असतात. या तीन महिन्यात होणाऱ्या कमाईवरच त्यांचा पोटाचा प्रश्न मिटतो. ऐन हंगामात कोरोनाचं संकट आल्याने बॅंडवाले अडचणीत सापडलेत. 

दोन मनांना एकत्र आणणारा, दोन कुटुंबांना जोडणारा सोहळा विवाह. वैवाहिक जीवनाची सुरवात धडाक्‍यात करण्याचे स्वप्न अनेकांचे असते. त्यावेळी बॅंड आवर्जून आणण्याची पद्धत आहे. गावदेव, वरातीत बॅंडच्या तालावर तरूणाई ठेका धरे. डोक्‍यावर लाल टोपी, पायात नक्षीदार बूट, अंगात आकर्षक जॅकेट परिधान केलेले बॅंडवाले पाहिल, की सोहळ्याला न्यारीच शोभा येते. ग्रामीण भागात आजही बॅंडची परंपरा सुरू आहे. लग्न सोहळे असो वा महापुरूषांची जयंती-पुण्यतिथी. त्याठिकाणी बॅंडवाल्यांना आवर्जून मागणी असते. लग्न सोहळ्यात महत्वाचे आकर्षण असणारे बॅंडवाले कोरोनाच्या दुष्टचक्रात सापडलेत. 

बॅंडच्या तालावर तरूणाई ठेका धरताना दिसते. मात्र त्यामागे त्यांचे कष्ट आहत्त. हंगामाच्या अगोदर सिनेमातील गाजलेल्या गाण्यांची तयारी केली जाते. एका गाण्याची तयारी दोन-तीन दिवसांत केली जातो. वाद्यवृंदात 15 ते 20 जण असतात. यंदा विवाहाचे तब्बल 78 मुहूर्त होते. जास्त मुहूर्त असल्याने यावर्षी चांगली कमाई होणार अशी कलाकारांना आशा होती. मुहूर्त जादा असल्याने वधुवरांच्या पालकांनी सोयीने मुहूर्त धरले. एका लग्नासाठी बॅंडवाले 15 ते 20 हजार रुपये घेतात. मुहूर्त असल्याने बॅंडचे बुकींगही झाले होते. सुगीचे दिवस येणार पण अचानक "कोरोना" चे संकट देशावर आले. देश लॉकडाऊन करण्यात आला. लग्न सोहळे रद्द करण्यात आले. लग्नासाठी बुकिंग केलेली बॅंडपार्ट्या नाईलाजाने रद्द कराव्या लागत आहेत. हजारो बॅंड कलाकारांवर संकट ओढवले आहे. 

मार्च ते जून हाच कमाईचा कालावधी. यावर्षी "कोरोना' आला. विवाह सोहळे मोजक्‍या, कमी लोकांच्या उपस्थितीत होताहेत. आम्हाला कोणी बोलावत नाही. ठरलेल्या तारखाही रद्द झाल्या आहेत.
- तानाजी मारुती माने, बॅंड मालक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Vaishanavi Girse : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी', सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने स्वत:ला संपवलं

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Marathi News Live Updates: ९० दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सोलापुरात परतीच्या पावसाची हजेरी, पहाटेपासून शहरात पावसाची संततधार

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT