पश्चिम महाराष्ट्र

शाहूवाडी तालुक्यात प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर - येळाणे (ता. शाहूवाडी) येथील एसटी आगार परिसरातील दत्त मंदिरानजीक संदीप बबन पाटील (वय २५, रा. निळेपैकी भोसलेवाडी, ता. शाहूवाडी) आणि सागाव (ता. शिराळा) येथील त्याच्या प्रेयसीने थिमेट प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघेही अत्यवस्थ आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. लग्न करण्यावरून वाद झाल्याने दोघांनी थिमेट प्यायल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी - संदीप व त्याची प्रेयसी हे दोघेही मुंबई येथील खासगी कंपनीत काम करतात. सुटीनिमित्त ते दोघेही गावी आले आहेत. त्यांना लग्न करावयाचे होते. तशी चर्चाही होती. 

दरम्यान, आज दोघेही येळाणे येथील एसटी आगार परिसरातील दत्त मंदिरात भेटले. त्या वेळी त्यांच्यात जोरात वादावादी झाली. त्यातून दोघांनीही थिमेट घेतले. आगार परिसरातील लोकांना घटना समजताच त्यांनी शाहूवाडी पोलिसांत संपर्क साधून याची माहिती दिली. दोघांनाही तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआरमध्ये पाठवण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे. 

संदीप मुंबईला खासगी कंपनीत काम करतो. गावाकडे त्याची आई, भाऊ राहतात. चार दिवसांपूर्वीच तो गावी आला आहे. त्याची प्रेयसी पदवीधर असून, तिही मुंबई येथील खासगी कंपनीत नोकरी करते. तिचे आई, वडील, भाऊ हे गावीच असतात. नोकरीच्या निमित्ताने त्या दोघांची ओळख झाली. त्यातून ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT