low rate tender works substandard; Sangli ZP Member aggressive
low rate tender works substandard; Sangli ZP Member aggressive 
पश्चिम महाराष्ट्र

कमी दराने निविदांची कामे दर्जाहीन; सांगली जि. प. सदस्य आक्रमक

अजित झळके

सांगली ः जिल्हा परिषदेतील विविध कामांच्या निविदा सुमारे 10 ते 20 टक्के कमी दराने घेण्यात आल्या आहेत. "बिलो टेंडर' हा प्रकार सर्रास महापालिकेत पहायला मिळत होता. तो प्रकार आता जिल्हा परिषदेत प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

अशा कामांच्या दर्जाबाबत सदस्यांनी शंका उपस्थित करून अधिकारी आणि ठेकेदारांचे यात संगनमत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे "बिलो टेंडर' घेतलेल्या प्रत्येक कामाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे. कामे पदरात पाडून घेण्यासाठी ठेकेदारांनी सुरू केलेल्या पळवाटांना दणका देण्याचा इरादा सदस्यांनी व्यक्त केला असून त्यामुळे खळबळ माजली आहे. 

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारे बांधकाम, रस्ते काम व अन्य कामांच्या निविदांचा सध्या धडाका सुरू आहे. त्यातील कित्येक कामे ही अंदाजित दरापेक्षा 10 ते 20 टक्के कमी दराने घेतली गेली आहेत. गेल्या काळातही अशा "स्वस्त' कामांचा सपाटा लागला होता. शाळा इमारतीचे कामेही 12 ते 15 टक्के कमी दराने घेतली गेली. जर ही कामे अंदाजित रकमेपेक्षा एवढ्या कमी दरात परवडतात, तर मग अंदाजित दर जास्त धरला जातो का, असा थेट प्रश्‍न सदस्य जितेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांचा दर्जेदार कामासाठी आग्रह आहे. त्यामुळे त्यांनीच या प्रकरणाच्या खोलात जावे, अशी मागणी पुढे आली आहे. त्यांनी गुडेवार यांना उघड आव्हान दिले असून, सर्व कामांच्या चौकशीची मागणी केली आहे. 

गुडेवार यांनी खमकेपणा दाखवावा 
कॉंग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील म्हणाले,""कमी दराने निविदा भरणे, हे प्रकरणच संशयास्पद आहे. कारण, जर अधिकाऱ्यांनी एखाद्या प्रकल्पाची किंमत निश्‍चित केली असेल, तर त्याहून कमी किमतीत होणारे काम दर्जेदार कसे होईल? तसे असेल तर मग अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिलिभगत करून या प्रकल्पांची किंमत वाढवून घेतलेली आहे का? तसे नसेल तर मग कामाच्या दर्जाची चौकशी झाली पाहिजे. ज्या प्रकारचे सिमेंट व अन्य साहित्य वापरणे आवश्‍यक आहे, जितके खोल खड्डे काढणे अपेक्षित आहे, ते तपासले जातात का? त्या यंत्रणांवर आम्ही का विश्‍वास ठेवायचा? कमी दरातील निविदांतून होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत शंका आहेत. चंद्रकांत गुडेवार यांनी या प्रकरणांत खमकेपणा दाखवावा. कमी दराने निविदा भरून केलेल्या प्रत्येक कामाची सखोल चौकशी करावी. त्यात आम्ही सदस्य त्यांना शंभर टक्के सहकार्य करू.'' 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT