कोल्हापूर - सकाळ मधुरांगण परिवाराच्या सभासद नोंदणीला सोमवारी दिमाखदार प्रारंभ झाला. यावेळी केक कापताना "सकाळ''च्या प्रशासन प्रमुख साधना दुधगावकर, प्रसिध्द नृत्यांगणा नुपूर रावळ-तोरो, शुभदा हिरेमठ, गीता हासूरकर, प्रिया बावडेकर, सुभद्रा गोपलकर, गीता वांगीकर
कोल्हापूर - सकाळ मधुरांगण परिवाराच्या सभासद नोंदणीला सोमवारी दिमाखदार प्रारंभ झाला. यावेळी केक कापताना "सकाळ''च्या प्रशासन प्रमुख साधना दुधगावकर, प्रसिध्द नृत्यांगणा नुपूर रावळ-तोरो, शुभदा हिरेमठ, गीता हासूरकर, प्रिया बावडेकर, सुभद्रा गोपलकर, गीता वांगीकर 
पश्चिम महाराष्ट्र

गटागटाने सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

दिमाखदार सोहळा - शहर आणि परिसरातील १८ केंद्रांवर नोंदणीला प्रारंभ 
कोल्हापूर - गेले काही दिवस उत्सुकता लागून राहिलेल्या मधुरांगण सभासद नोंदणीला आजपासून दिमाखदार प्रारंभ झाला. महिला व तरुणींनी पहिल्या दिवसापासूनच गटागटाने नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘माझे मन - माझे स्पंदन’ असे ब्रीद घेऊन यंदाही वर्षभर सभासदांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात सभासद नोंदणीचा प्रातिनिधीक सोहळा झाला. ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, प्रशासन प्रमुख साधना दुधगावकर, प्रसिद्ध नृत्यांगना नूपुर रावळ-तोरो, अंतरंग संस्थेच्या शुभदा हिरेमठ आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

उद्यमनगरातील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयासह शहरातील १८ केंद्रांवर एकाच वेळी सभासद नोंदणीला प्रारंभ झाला असून, सभासद होताच हमखास भेटवस्तू दिल्या जात आहेत.  यंदा ‘मधुरांगण कट्टा’ ही नवीन संकल्पना घेऊन वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. महिलांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठीचे हे उपक्रम असतील. आज झालेल्या प्रातिनिधिक सभासद नोंदणी कार्यक्रमाला सुभद्रा गोपलकर, गीता हासूरकर, प्रीती हिलगे, सुप्रिया कुलकर्णी, प्रिया चिवटे आदी उपस्थित होत्या. 


मंजिरी देवाणावर यांनी विविध गीते सादर केली. प्रिया बावडेकर यांनी विविध मनोरंजनात्मक खेळ घेतले. त्यात गीता वांगीकर, वर्षा माने, जयश्री गुळवणी, नूपुर रावळ-तोरो, रेखा शानबाग, स्नेहा भाट विजेत्या ठरल्या. दरम्यान, मधुरांगण सभासद होताच पुढे वर्षभर मनोरंजन कार्यक्रम आणि स्पर्धांबरोबरच फावल्या वेळेत प्रत्येक महिला कशी स्वयंसिद्धा बनेल, यासाठीचे विविध कार्यक्रम, कार्यशाळांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. चला तर मग, ‘मधुरांगण’च्या व्यासपीठावर तुमचं नक्कीच स्वागत आहे. आजच संपर्क साधा जवळच्या नोंदणी केंद्रावर. 

सभासदांना मिळणारे फायदे 
- नोंदणी फी केवळ ५९९ रुपये. सभासद होताच चार भेटवस्तूंचा साडेसातशे रुपये किमतीचा गिफ्ट बॉक्‍स. 
- पहिल्या एक हजार सभासदांना अग्रवाल गोल्डस्‌कडून मोत्याची नथ. 
- सकाळ माध्यम समूहाचे ‘तनिष्का’ मासिक दिवाळी अंकासह सर्व सभासदांना घरपोच मिळणार. 
- सर्व सभासदांचे ओरल हेल्थ सेंटरकडून वर्षभरात एकदा दातांचे क्‍लिनिंग. 
- महिन्याला एक मनोरंजनपर कार्यक्रम व एक कार्यशाळा. 
- वर्षभरात मोठ्या सहलींसह स्थानिक अभ्यास सहलींचे आयोजन. 
- नोंदणीसाठी येताना आयकार्ड आकाराचे दोन फोटो आवश्‍यकच. 
- अधिक माहितीसाठी संपर्क- जयश्री देसाई (९१४६०४१८१६)

येथे नोंदणी करता येईल 
कसबा बावडा - शंकर चेचर (९९७०६०२४०६) ० जोतिबा रोड - प्रिया बावडेकर (९८९०९३५४६३) ० नागाळा पार्क - मंजिरी देवाणावर (९३२५४६७३८३) 
खानविलकर पेट्रोल पंप परिसर - अनुराधा पित्रे (९८६००३८३२७) -राजारामपुरी - गीता वांगीकर (९४२०४५९५९९) कदमवाडी - पद्मा पाटील (९४०३८५१५५५) 
मंगळवार पेठ - सुभद्रा गोपलकर (७८४१८७२५६७) - साळोखेनगर व साने गुरुजी वसाहत - सुप्रिया कुलकर्णी (९८८१८०१५१५) 
लक्ष्मीपुरी - अष्टविनायक ट्रेडर्स - विजय साळुंखे (९७६७२८२६१३) ० बिनखांबी गणेश मंदिर - कल्पना चिटणीस (९२२६३५२६२९) 
ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसर - शरयू माने (९८२३३५३००३) ० गंगावेस - प्रिया चिवटे (९४२२४०८९३५) 
बाबूजमाल परिसर - गीता हासूरकर (८९८३६६१६५५) ० शाहू मैदान परिसर - संजीवनी दीक्षित (९६५७१२१७२५) 
हनुमाननगर-पाचगाव - प्रीती हिलगे (९३७०३१३१९४) ० आर. के. नगर - स्नेहा भाट (९८२०३८३४१२) 
मोरेवाडी-आर. के. नगर - सुरेखा उबारे (७५८८२६७५४८) ० संभाजीनगर -स्नेहा शिंदे (८०८७२७३९१०)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT