mahantesh kavatagimath
mahantesh kavatagimath sakal
पश्चिम महाराष्ट्र

Chikkodi News : बोम्मईंच्या विनंतीवरून कृष्णेत सोडले पाणी; महांतेश कवटगीमठ

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी : दक्षिण भारताची गंगा म्हणून कृष्णा नदी प्रसिद्ध आहे. कृष्णेतील पाणी अनेक गावांना पिण्यासाठी जाते. त्यासाठी १४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून बोलले होते.

त्याची दखल घेऊन मानवतेच्या दृष्टीने महाराष्ट्राने वारणेतून कृष्णेला पाणी सोडले आहे. त्याचे तरी राजकारण प्रकाश हुक्केरी यांनी करू नये, असा टोला विधानपरिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी हाणला.

एकसंबा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कृष्णा नदीतून बहुग्राम पाणी योजनेतून अनेक गावांना पिण्यासाठी पाणी दिले जाते. सध्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यासाठी डॉ. प्रभाकर कोरे, रमेश कत्ती, अण्णासाहेब जोल्ले, गद्दीगौडर यांच्यासह आपण शिष्टमंडळाने जाऊन पाण्यासाठी विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी फोनवरून विनंती केली होती.

मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यानंतर कर्नाटकचे मुख्य सचिव यांनी महाराष्ट्रात जाऊन त्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून हा निर्णय झाला आहे. त्यानुसार वारणेतून पाणी सोडले जात आहे. याची माहिती माध्यमांतून व इतरांकडून मिळाल्यानंतर प्रकाश हुक्केरी केवळ दिखावा करण्यासाठी महाराष्ट्रात जाऊन आपणच पाणी सोडण्यास सांगितल्याचा डांगोर पिटत आहेत.

प्रकाश हुक्केरी यांनी आता असे राजकारण करणे सोडून द्यावे. आपण केलेले आपण केले म्हणावे व जे आपण केले नाही त्यात किमान शांत बसावे. या एकाच प्रकरणात नव्हे तर हुक्केरी यांनी अनेकदा असे दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचे काम केले आहे. यावेळी रमेश कत्ती, संजय चौरासिया, अप्पासाहेब जोल्ले, बाळासाहेब वड्डर, आप्पासाब चौगुले, सतीश आप्पाजीगोळ आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT