पश्चिम महाराष्ट्र

निर्माल्याचे खत करा

सकाळवृत्तसेवा

सातारा - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मूर्तींचे विसर्जन पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये न करता, ग्रामपंचायतींनी कृत्रिम हौद तयार करावेत अथवा मूर्तींचे संकलन करून कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करावे. तसेच सर्व निर्माल्याचे संकलन करून त्याचा खतनिर्मितीसाठी उपयोग करावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.

गणेशोत्सव काळात पर्यावरणपूरकदृष्ट्या उपाययोजना करण्याबाबत काढलेल्या पत्रात नमूद केले आहे की, गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात  पिण्याच्या पाण्याच्या जलस्त्रोतांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. निर्माल्य व सजावटीचे साहित्य पाण्यामध्ये टाकण्यात येते. त्यामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढतो. याबाबत पर्यावरण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायतींनी करावी. मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौद तयार करावेत अथवा मूर्ती संकलन करून त्या कृत्रिम हौदात विसर्जित कराव्यात. निर्माल्य, पूजा, सजावटीचे साहित्य पाण्यात टाकण्यात येते. हे टाळण्यासाठी स्वतंत्र्यरित्या निर्माल्य, पूजेचे साहित्य संकलित करावे. निर्माल्यापासून खतनिर्मिती करावी. त्यासाठी विसर्जनानंतर ४८ तासांत त्याचे संकलन करावे. मूर्ती संकलनासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

‘सकाळ’ने वेधले लक्ष
ग्रामीण भागात थेट नदी, विहिरींमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. तसेच निर्माल्यही जलस्त्रोतांत फेकले जाते, याबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन ‘सकाळ’ च्या प्रतिनिधीने डॉ. शिंदे यांना केले होते. त्याची दखल घेत डॉ. शिंदे यांनी हे पत्र १९ रोजी काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

SCROLL FOR NEXT