mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढा नगरपालिका शिक्षण मंडळाचा कारभार ढिसाळ

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - नगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारीच्या मंगळवेढा व कुर्डूवाडी या पदभाराने शिक्षण मंडळात मनमानी सुरू असल्याने शाळांची गुणवत्ता ढासळू लागली आहे.  शिक्षण मंडळाच्या मनमानी कारभाराबद्दल पालकांनी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्याकडे तक्रार दिली असून, मुख्याधिकारी यांनी या प्रकारांची गंभीर दखल घेतली.

नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाअंतर्गत आठ व खासगी शाळा आहेत. यात साडेतीन हजार विद्यार्थी शिकत असून, शिष्यवृत्तीसह अन्य परीक्षेत तालुका नेहमी अग्रेसर राहिल्याने न.पा.शाळेची गुणवत्ता कौतुकास्पद ठरल्याने यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढा आहे. सध्या शिक्षण मंडळाकडे 45 शिक्षक कार्यरत असून चार पदे रिक्त आहेत. दोन तालुक्याच्या पदभार असल्याने शाळांना भेटी देणे वार्षिक तपासणी करण्यास विलंब व दैनंदिन कारभार पाहताना दुर्लक्ष होत आहे. याशिवाय विद्यार्थी व शिक्षकाची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरण्याच्या कामामुळे विद्यार्थीच्या प्रगतीकडे लक्ष देता येत नाही.

त्यातच पालकांशी उद्धट बोलणे विद्यार्थ्यांना भौतिक सोयी सुविधा देण्याबाबत दुर्लक्ष होत आहे. काही शिक्षक  सोयीने शाळा भरविणे, स्वच्छता पिण्याचे पाणी याबाबत दुर्लक्ष होत आहे. काही वेळा शिक्षक ज्या शाळेत विद्यार्थी ही त्या शाळेला अशी पालकांची भूमिका होवू लागली.

प्रशासन अधिकाऱ्यांच्या दोन तालुक्यातील कामामुळे  शिक्षकावर नियत्रंण ठेवता येत नसल्यामुळे पालक वर्गातून नाराज व्यक्त होत आहे. 

प्रशासन अधिकारीवर दोन तालुक्याचा पदभार असल्याने शिक्षकांवर वचक नसल्यामुळे शाळेचे, विध्यार्थ्याचे नुकसान होत आहे. त्यांनी स्वताहून बदली करून घ्यावी अन्यथा शिक्षण विभागाने पुर्णवेळ अधिकारी द्यावा. या मागणीबाबत नगरसेवक शिक्षण उपसंचालकाकडे तक्रार करणार आहे.
- अजित जगताप पक्षनेते नगरपालिका

मंगळवेढ्यातील 29 व कुर्डूवाडीत 31 शाळेबरोबर बारावीच्या भरारी परीक्षेच्या भरारी पथकाची जबाबदारी असल्याने पालकांनी तक्रार केलेल्या शाळेचे मुख्याध्यापक रजेवर असल्याने इतर शिक्षकांवर पदभार आहे.
- सचिन आनंतकळवस, प्रशासन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT