पश्चिम महाराष्ट्र

मांडळूच्या तस्करीप्रकरणी कासेगावच्या दोघांना अटक 

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड -  मांडूळाची तस्करीने विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना मालखेडला अटक झाली. दोघेही मांडूळासह लॉजवर थांबले होते. तेथे पोलिसांनी सापळा रचून काल सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकला. पांडुरंग भगवान शिंदे (वय 34), जयवंत शंकर ताटे ( वय 33, दोघेही रा. कासेगाव) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 30 लाख रुपये किमतीचे "रेड सॅण्डबो' जातीचे मांडूळ व दुचाकी जप्त केली आहे. 

मालखेडच्या हद्दीत लॉजच्या परिसरात दोघेजण मांडूळाच्या तस्करीसाठी आल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर, हवालदार म्हेत्रे यांनी मालखेड येथील लॉज परिसरात सापळा रचला. सायंकाळी पाचच्या सुमारास शिंदे व ताटे हे दुचाकीवरून तेथे आले. त्यांच्या गाडीला पिशवी होती. पोलिसांना संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले. पिशवीतील डब्यात काळपट रंगाचा 64 सेंटीमीटर लांबीचे व आठ सेंटीमीटर जाडीचा मांडूळ जातीचा साप असल्याचे दिसले. त्याची विक्री करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. धनदौलत वाढावी, या अंधश्रद्धेपोटी मोठ्या किमतीला मांडूळ खरेदी करतात, असे संशयितांनी पोलिसांना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT