पश्चिम महाराष्ट्र

'मराठा आंदोलनप्रकरणी फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर गु्न्हे दाखल करा' 

भारत नागणे

पंढरपूर : मराठा समाज आरक्षण आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळेच राज्यात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा गैरफायदा घेत बसेस फोडल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राज्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान मराठा समाज कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी मागे घ्यावेत, अन्यथा राज्यातील मराठा समाज लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर बहिष्कार टाकेल, असा इशारा यावेळी रामभाऊ गायकवाड यांनी दिला.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी आज येथील श्रीराम मंगल कार्यालयात  राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. बैठकी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामभाऊ गायकवाड यांनी मराठा समाजाची भूमिका मांडली.

यावेळी गायकवाड म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण लागू करावे या मागणीसाठी राज्यभर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केले होते. आंदोलन दरम्यान एसटीबसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होेते. या नुकसानीस जबाबदार धरुन राज्यातील 13 हजार 792  मराठा तरुणांवर सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. 

पोलिसांनी जाणूनबुजून  दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. गुन्हे मागे घेण्याचे केवळ आश्वासन दिले आहे. अद्याप एक ही गु्न्हा मागे घेतला नाही.त्यामुळे मराठा तरुणांमध्ये सरकार बद्दल रोष वाढला आहे.

लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी राज्य शासनाने मराठा समाजातील तरुणांवर दाखल केले गुन्हे मागे घ्यावेत, आरक्षण मागणीसाठी बलिदान दिलेल्या 24 हुतात्म्यांना 10 लाखांची मदत आणि वासरला सरकारी नोकरी द्यावी. अन्यथा लोकसभा निवडणुकीत  भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेपूर्वी मराठा समाजाच्या मागण्यापूर्ण केल्या तर भाजपच्या बाजूने मराठा समाज मतदान करेल असेही यावेळी श्री. गायकवाड यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रज्ञा जाधव, विनोद पोखरकर, नवनाथ माने, समाधान फाटे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT