Narayan-Rane
Narayan-Rane 
पश्चिम महाराष्ट्र

राणेंनी सांगलीत मांडला 'महाराष्ट्र स्वाभीमान पक्षा'चा अजेंडा

सकाळवृत्तसेवा

सांगली : काँग्रेसमधून बाहेर पडून हिंदुत्ववादी भाजपशी घरोबा करणाऱ्या नारायण राणे यांनी आपल्या महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचा अजेंडा मात्र सर्वधर्मसमभावाचा असेल असे आज जाहीर केले. पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या राणे यांनी आज येथे सकाळी वसंतदादांच्या समाधीस्थळी भेट घेऊन जिल्ह्यातील निवडक कार्यकर्त्यांशी येथील विश्रामगृहावर संवाद साधला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नेहमीप्रमाणेच त्यांनी यावेळीही उध्दव ठाकरे यांच्यावर कट कारस्थानी असे टिकेचे आसूड ओढताना त्यांच्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अखेरच्या काळात अनंत वेदना झाल्या. जादा बोलाल तर ते सर्व प्रसंग जाहीर करून असा इशारा दिला. 

भाजपवर आपला विश्‍वास कायम असून ते मला फसवू शकत नाहीत असेही ते म्हणाले. एरवी आक्रमक वक्तव्ये करणाऱ्या राणे यांनी आज मात्र महाराष्ट्राच्या चौफेर विकासाची दृष्टी घेऊन या सरकारने पुढे जायला हवे असा ज्येष्ठत्वाचा सल्ला दिला. सांगलीत गेल्या काही दिवसात झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांचा उल्लेख करून ते म्हणाले, "शिक्षण, पायाभूत सुविधांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षातील सरकारच्या कारभाराबाबत उद्योजक-शेतकरी नाराज आहेत असा समज पसरवणारेच सत्तेत बसले आहेत. त्यामुळे सरकारला उर्वरित दोन वर्षात गतीमान करण्यासाठी मला सत्तेत जायचे आहे. सर्व पक्षीय नेते फक्त एकमेकांचे उणे-दुणे काढत आहेत. सत्ता असेल तरच सारे प्रश्‍न सोडवता येतात. त्यामुळे मी सरकारसोबत राहूनच सारी कामे करून घेणार आहे. आमचा पक्ष महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेऊन पुढे जात आहे. मराठा, धनगर आरक्षण हा आमचा अजेंडा आहे तसाच दलित-आदिवासी यांचे आर्थिक जीवनमान मुख्य प्रवाहाबरोबर आणावे लागेल. कालच आम्ही पक्षाचे दिशा धोरण जाहीर केले आहे. आता आमचा पक्ष सर्व जाती धर्मासाठी आहे. तशीच आमची घटना बनवली आहे.'' 

लांबणीवर पडलेल्या मंत्रीपदाबाबत राणे म्हणाले, "शिवसेनेनं सत्ता उपभोगली पण जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत. उद्धव यांना शेती, राजकारणाचा गंध नाही, सत्ता द्या बेळगाव महाराष्ट्रात विलीन करतो म्हणतात, आता सत्तेतच आहात की मग? त्यांना सामान्यांचे प्रश्न, शेतकरी, युवक, विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांची जाण नाही. शिवसेनेच्या विरोधामुळे माझे मंत्रीपद थांबलेले नाही. कारण एवढी काय त्यांची ताकद नाही. काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीतून ते दिसून आलेच आहे. त्यांच्या मदतीविनाही लाड जिंकलेच असते. कदाचित सध्या गुजरातमधील परिस्थिती योग्य नाही, म्हणून कदाचित भाजपकडून थांबले असावे. माझा फडणवीस यांच्यावर विश्‍वास आहे. सध्या शिवसेनेचा देवेंद्र यांना व्यत्यय आहे. तो सहन करून सरकार चालविले जात आहे. लवकरच सुधारणा होईल. सध्या मी पक्ष म्हणून एनडीएसोबत आहे. भविष्यात भाजपमध्ये विलिन व्हायचे किंवा नाही याबाबत विचार केलेला नाही. मात्र मी सध्या पक्षबांधणीवर भर दिला आहे.'' 

तुमची भाजपने फसवणूक केली का प्रश्‍नावर ते म्हणाले, "माझी कोणीच फसवणूक करू शकत नाही. चंद्रकात पाटील किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर माझा विश्‍वास आहे. अपमान सहन करून मी कुठेच थांबत नाही. आणि मला कधीच कोठे तशी वागणूक मिळाली नाही. काँग्रेसने मला 13 वर्षे सतत मुख्यमंत्री करतो म्हणूनच सांगितले. 
मला कोणत्याही पक्षांमध्ये अपमानाची वागणूक मिळाली नाही, प्रत्येक ठिकाणी मी स्वाभिमान सांभाळून होतो. राणे काय ताकद आहे ते कळले आहे. मला रोखण्यासाठी भाजप-सेना-राष्ट्रवादी अशी भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र न येणारे पक्ष राणेला संपवण्यासाठी एकत्र येतात. हाच माझा विजय आहे. पदासाठी आणि सत्तेसाठी मी कधीच प्रयत्न केले नाहीत, मी आता पर्यंत जे काही मिळवले ते मेरीटवरच. पदे मला लोकांच्या सेवेसाठी हवी आहेत. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. गुजरातचा पहिला टप्पा पार पडला आहे. पुढच्या टप्प्यात माझा नक्की विचार होईल. चुरस असली तरी गुजरातमध्ये भाजपच जिंकेल असे मला वाटते.'' 

राणे यांनी मला सर्व पक्षातून मागणी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "अगदी वर्षापूर्वी शिवसेनेचीही होती. मात्र मी त्यांना सांगितले की मी शिवसेना सोडली आहे. आता तिथे जाणार नाही. एकदा सेना सोडली तर मग पुन्हा तिथेच कशाला जा. प्रादेशिक पक्षाने भवितव्य आहे मात्र ते नेतृत्वावर अवलंबून आहे. शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेस मधील वर्षे वाया गेली असे मी म्हणणार नाही कारण मी 24 तास लोकांसोबत असतो. मात्र आता पुढील आयुष्य वाया जाऊ नये यासाठी काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष काढला आहे.'' सांगली महापालिका निवडणुकीच्या संबधाने विचारलेल्या प्रश्‍नावर ते म्हणाले, "आम्ही सर्व लोक पारखून घेत आहोत. निवडणूकीबाबत भविष्यातच निर्णय करु. सांगलीमध्ये अनेक लोक भेटत आहेत. त्यामुळे आत्ताच त्यावर बोलणे घाईचे ठरेल.'' 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT