File photo of Sushil Kumar Shinde
File photo of Sushil Kumar Shinde 
पश्चिम महाराष्ट्र

'एक्‍झिट पोल' सोमवारपर्यंत एन्जॉय करा : सुशीलकुमार शिंदे

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : "राज्यातील सत्ताधाऱ्यांमधील मतभेद आमच्यासाठी समाधानाची बाब आहे," अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. गुजरात आणि हिमाचल प्रदेशसंदर्भातील एक्‍झिट पोल सोमवारपर्यंत एन्जॉय करा, असेही ते म्हणाले. 

गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवनात अभिवादनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर शिंदे बोलत होते. "सत्ताधाऱ्यांमधील मतभेद आमच्यासाठी चांगली बाब आहे. एखाद्या प्रश्‍नावर सत्ताधाऱ्यांत मतभेद होत असतील तर ते विरोधकांना हेच हवे असते,'' असे सांगताना शिंदे यांनी सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून सुरु असलेल्या गदारोळाबाबत न बोलणे पसंत केले. 

एक्‍झिट पोल कधी खरे ठरत नाहीत, असे सांगून शिंदे म्हणाले,"आपण सगळेच 18 डिसेंबरपर्यंत एक्‍झिट पोल एन्जॉय करूयात. हिमाचल प्रदेशात पाच वर्षे काँग्रेसचे, पाच वर्षे भाजपचे सरकार होते. यावेळी आमचे सरकार आहे. यंदा आमचे सरकार येणार नाही असे वाटत होते, मात्र अशा घडामोडी झाल्या की आम्ही भाजपला किमान टक्कर देऊ.'' लोकसभेसाठी सर्वांकडूनच आग्रह होत असल्याबाबत विचारले असता, मी पूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता बोलणार नाही, असे सांगितले. 

राज्य शासनच्या उदासनीतेमुळेच रखडले विमानतळ 
सोलापुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत राज्य शासन उदासीन आहे. त्यामुळे त्याचे काम रखडले आहे. मी मंत्री असतानाच सर्व प्रशासकीय सोपस्कर, करार झाले आहेत. ते फक्त पुढे रेटायचे आहेत. मात्र तितकेही विद्यमान सरकारला जमले नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठविले आहे, असेही शिंदे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT