पश्चिम महाराष्ट्र

पुणे-सातारा पॅसेंजर वेळेत बदल 

सकाळवृत्तसेवा

मिरज - कोल्हापूर-पुणे आणि पुणे-सातारा या पॅसेंजर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर-पुणे गाडी पुण्यात सुमारे पावणेदोन तास अगोदर पोचेल. पुणे-सातारा पॅसेंजर दोन तास लवकर सुटेल. पुणे-सातारादरम्यानच्या नोकरदार, विद्यार्थी प्रवाशांच्या सोयीसाठी बदल केल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे कार्यालयातून सांगण्यात आले. एक मार्चपासून महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर नव्या वेळेनुसार गाड्या धावतील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून नवे वेळापत्रक कायम केले जाईल. 

कोल्हापूर-पुणे (51410) पॅसेंजर कोल्हापूरहून पहाटे 4.45 वाजता सुटते. मिरजेत सहा वाजता येते. पुण्यात दुपारी 4.25 वाजता पोचते. नव्या वेळापत्रकानुसार ती पुण्यात 105 मिनिटे अगोदर म्हणजे दुपारी 2.40 वाजताच पोचेल. परतीसाठी (51435) पुण्यातून सायंकाळी 5.05 वाजता सुटते. आता दोन तास उशिरा म्हणजे सायंकाळी 7.10 वाजता निघेल. सांगली, मिरज व कोल्हापुरातील वेळापत्रकात कोणताही बदल नाही. 

पुण्यातून सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर (पाचनंतर) साताऱ्यासाठी पॅसेंजर नाही. प्रवाशांना रात्री उशिराच्या एक्‍स्प्रेस गाड्यांतून, एसटीने साताऱ्याला परतावे लागते. हे लक्षात घेऊन हा बदल केला आहे. 

कोल्हापूर-पुणे पॅसेंजर मार्गात अनेक स्थानकांत पंधरा ते तीस मिनिटांचे थांबे नाहक घ्यायची. हे सर्व थांबे दोन-पाच मिनिटांवर आणले आहेत. त्यातून 105 मिनिटांची बचत केली. त्यामुळे पॅसेंजर दुपारी 4.25 ऐवजी 2.40 वाजताच पोचेल. या पॅसेंजरने पुण्यात जाऊन एक-दोन तासांची कामे करून साडेचारच्या निजामुद्दीन एक्‍स्प्रेसने सांगली-कोल्हापूरला परतणे शक्‍य झाले आहे. 

नवे वेळापत्रक असे (कंसात सध्याची वेळ)  
साताऱ्यातून पुण्यासाठी ः (गाडी 51410) 

सकाळी 9.50 (10.35). जरंडेश्‍वर 10.00 (10.53). पळशी - 10.15 (11.06). वाठार - 10.30 (11.19). आदर्की - 10.45 (11.40). सालपे - 10.55 (12.17). लोणंद - 11.10 (12.30). नीरा - 11.30 (12.58). वाल्हे - 11.45 (01.12). दौंडज - दुपारी 12.00 (01.26). जेजुरी - 12.20 (01.59). राजेवाडी - 12.35 (02.14 ). आंबले - 12.45 (02.23). शिंदवणे - 01.00 (02.38). आळंदी - 01.10 (03.30). फुरसुंगी - 01.20 (03.43). सासवड - 01.30 (03.53). घोरपडी - 01.50 (04.10). पुणे - 02.40 (04.25). 

पुण्यातून साताऱ्याकडे ः (गाडी 51435) 
सायंकाळी 07.10 (05.05). घोरपडी - 07.18 (05.14). सासवड - 07.30 (05.27). फुरसुंगी - 07.37 (05.38). रात्री आळंदी - 07.45 (05.55). शिंदवणे - 07.55 (06.07). आंबले -08.08 (06.27). राजेवाडी - 08.15 (06.34). जेजुरी - 08.35 (06.52). दौंडज -08.45 (07.04). वाल्हे - 08.55 (07.17). नीरा - 09.15 (07.35). लोणंद - 09.30 (07.46). सालपे - 09.40 (08.03). आदर्की - 09.55 (08.30). वाठार - 10.25 (08.48). पळशी - 10.35 (09.01). जरंडेश्‍वर - 10.45 (09.16). सातारा - रात्री 11.45 (09.45). 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT