Marathi news Nangare Patil Hupari Singham officer
Marathi news Nangare Patil Hupari Singham officer  
पश्चिम महाराष्ट्र

नांगरे पाटील यांच्या हस्ते हुपरीतल्या 'सिंघम'चा गौरव

बाळासाहेब कांबळे

हुपरी (जि. कोल्हापुर) : गणेश मंडळे व लोक सहभागातून शहरात ७ लाख १७ हजार रुपयांचे  ऑप्टिकल फायबर  सीसीटिव्ही कॅमेरे बसवून व गणेश उत्सव डॉल्बिमुक्त करुन विधायक गणेश उत्सव कसा असतो याचा आदर्श हुपरीकरांनी घालून दिला आहे, असे प्रतिपादन कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आज येथे केले. 

हुपरी पोलिस ठाण्याच्या वतीने विविध संस्था, गणेश मंडळे व लोकसहभागातून शहरात ३५  ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यांचे उद््घाटन व गणराया अॅवार्ड २०१७ वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते होते. अपर पोलिस अधिक्षक डॉ. दिनेश बारी, पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी तानाजी नरळे आदी मान्यवर  प्रमुख उपस्थित होते.

सहायक पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांना पाच हजार रुपयांची तब्बल चार बक्षिसे नांगरे पाटील यांनी जाहीर केली. 

श्री. नांगरे पाटील म्हणाले, हुपरी पोलिस ठाण्याची झालेली अप्रतिष्टा धुवून काढण्यासाठी सहायक पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी अवघ्या तीन महिन्यांत समाज व लोकांशी एकरुप होत नाठाळांच्या माथी काठी हाणत अवैध धंदे मोडून काढण्या बरोबरच महिलांमध्ये विश्वासाची भावना निर्माण केली आहे. आदर्श अधिकारी कसा असावा याचे नामदेव शिंदे हे उत्कृष्ट उदाहरण असून ते 'सिंघम' आहेत.'

स्वागत व प्रास्ताविक करतांना सहायक पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे म्हणाले, मटका, जुगाराचे क्लब, बेकायदेशीर दारू विक्री यासारखे अवैध धंदे, डिजीटल फलक, सामाजिक सलोखा बिघडविण्यास कारणीभूत ठरणारे झेंडे, दसरा दिवाळीत चालणारे तीन पानी जुगार अड्डे मुळासकट उखडून टाकू  शकलो. दहीहंडीच्या वेळी बाया नाचवण्याचे हिडीस प्रकार बंद केले. ठाण्याची प्रतिमा सुधारण्यासाठी  काही गोष्टी कायदा सोडून कराव्या लागल्या आणि त्यास यश येऊ शकले ते केवळ वरिष्टांचे पाठबळ आणि जनतेच्या सहकार्यामुळेच.

यावेळी डॉ. दिनेश बारी, भाजपचे शहराध्यक्ष सुदर्शन खाडे, विक्रम घाटगे, हवालदार संतोष तेली, समिक्षा जोशी आदिंची भाषणे झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT