bhigwan
bhigwan 
पश्चिम महाराष्ट्र

सावित्रीबाईंनी बहुजनांच्या शिक्षणाचा पाया रचला - कोकाटे 

प्रशांत चवरे

भिगवण : भारतीय शिक्षणाच्या आद्य जननी असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मोफत शिक्षणाचा पाया रचला. त्यांच्या शाळेमध्ये सर्व जातीच्या व सर्व धर्माच्या मुली शिक्षण घेत होत्या. सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे महिलांच्या शिक्षणाची वाट खऱ्या अर्थाने सुकर झाली त्यांचा आदर्श महिलांनी समोर ठेवला पाहिजे असे प्रतिपादन जेष्ठ शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी केले. 
येथील बौध्द विहारांमध्ये अमर बौध्द युवक संघनटेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे व सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी  पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, इंदापुर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक शिंदे, बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, आर. पी. आय. चे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम शेलार, उपसरपंच प्रदीप वाकसे, माजी उपसरपंच संजय रायसोनी, माजी सरपंच अनिल काळंगे, अजिंक्य माडगे, गणेश वायदंडे, माऊली नगरे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. कोकाटे पुढे म्हणाले, सावित्रीबाईं यांचे व्यक्तीमत्व हे अष्टपैलु होते. सावित्रीबाईंनी कवयित्री, लेखिका, समाजसुधारक अशा अनेक भूमिका सक्षमपणे निभावल्या. सध्या तणावाच्या परिस्थितीबाबत बोलताना कोकाटे म्हणाले, आपल्या देशामध्ये विविध जाती व धर्मांचे लोक राहतात. दंगली करुन व जाती जातीमध्ये व धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करुन देशापुढील प्रश्न सुटणार नाही. उत्तम शिक्षण घेऊन सर्वांनी एकत्र राहण्यातच समाज व राष्ट्रहित आहे. प्रास्ताविक व सूत्रसंचाल अमोल कांबळे यांनी केले आभार बाळासाहेब शेलार यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन रोहित शेलार, अजय शेलार, किरण कांबळे, सिध्दार्थ धेंडे, मनोज भोसले आदींनी नियोजन केले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT