पश्चिम महाराष्ट्र

उद्दिष्ट १२५५ अन्‌ प्रशिक्षण ४७० जणांना

सकाळवृत्तसेवा

सातारा - जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबवल्या जाणाऱ्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून जिल्ह्यासाठी एक हजार २५५ प्रशिक्षणार्थींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, आजवर ते केवळ ३७.४५ टक्‍के पूर्ण झाले आहे. शासनाने या योजनेची व्यापकता वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण उपलब्ध करणे आवश्‍यक आहे.

केंद्र सरकार ‘स्कील इंडिया’ अंतर्गत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवत आहे. त्यातून प्रशिक्षणार्थींना विविध कौशल्यासंदर्भात कोर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यासाठी आठ संस्थांना प्रशिक्षण कोर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये होम हेल्थ, जनरल ड्युटी असिस्टंट, फार्मसी असिस्टंट, इर्मजन्सी मेडिकल टेक्‍निशियन बेसिक, ट्रेनी असोसिएटस, हाउसहोल्ड सर्व्हिस, शोरूम होस्टेस, फिटर, वेल्डिंग असिस्टंट, सेल्स पर्सन्स, बीपीओ नॉन व्हाइस, अकाउंट असिस्टंट, मेकॅनिकल असेंब्ली, बेसिक इलेक्‍ट्रॉनिक्‍स, कॉम्प्युटर नेटवर्क असिस्टंट, हाउस स्कीपर, इंडस्ट्रीअल सिक्‍युरिटी गार्ड आदी कोर्स उपलब्ध आहेत.

या कोर्सचे प्रशिक्षण देणाऱ्या आठपैकी सात संस्था परजिल्ह्यात प्रशिक्षण देत आहेत. परजिल्ह्यात प्रशिक्षणाचा लाभ घेण्याची मानसिकता नसल्यामुळे 
जिल्ह्यातून कमी प्रमाणात प्रशिक्षणाचा लाभ घेतला जात आहे. जिल्ह्यास एक हजार २५५ प्रशिक्षणाचे उद्दिष्ट असताना आजवर ते ४७० इतके म्हणजे ३७.४५ टक्‍के पूर्ण झाले आहे. ते वाढविण्यासाठी जिल्ह्यात या संस्थांमार्फत कोर्स उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलली पाहिजेत.

तालुकानिहाय लाभार्थी
सातारा     ७७ 
कोरेगाव     ३३ 
खटाव     ३५ 
माण     ३२ 
फलटण     ५६ 
खंडाळा     ४४ 
वाई     ३५ 
महाबळेश्‍वर     १४ 
जावळी     ६ 
कऱ्हाड     ३० 
पाटण     १०८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT