cyber security
cyber security 
पश्चिम महाराष्ट्र

मी पोलिसांना भीत नाही, ते मला पकडू शकत नाहीत!

परशुराम कोकणे

सोलापूर : ओएलएक्‍सवर मोबाईल विकत घेऊन ऑनलाइन पैसे पाठविले, पण मोबाईल आला नाही. याबाबत तक्रार करतो, असे म्हटल्यावर मी पोलिसांना भीत नाही, ते मला पकडू शकत नाहीत! असा मेसेज सोलापूरच्या तरुणाला आला आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निखिल सुभाष अंकुशे (वय 18, रा. उत्तर कसबा, मसरे गल्ली, सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. निखिल याने ओएलएक्‍स संकेतस्थळावर मोबाईलची निवड केली. आरोपीने निखिल यास मोबाईल घ्यायचे असेल तर पेटीएमद्वारे पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. निखिल याने पाच हजार आणि डिलिव्हरी चार्जेस म्हणून एक हजार 850 रुपये पाठविले. मोबाईल घेऊन जाण्यास सांगितले. उशीर झाला म्हणून दंड स्वरूपात एक हजार 850 रुपयांची मागणी केली. निखिलने पुन्हा पैसे पाठविले. त्यानंतर आरोपीने निखिल यास मोबाईलवर फोन केला. आपण फसलात, हे सर्व फेक आहे. आपण वेड्यात निघालात. आम्ही असेच करून लोकांची फसवणूक करून पैसे कमावतो.

व्हॉट्‌सऍपवर मेसेज करून तू पण हेच काम कर. असेच करून पैसे कमव असे सांगितले. पोलिसांत तक्रार करतो असे म्हटल्यावर मी पोलिसांना भीत नाही, ते मला पकडू शकत नाहीत, असा मेसेज पाठविला. ही घटना 13 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत घडली. पोलिस उपनिरीक्षक नागेश मात्रे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT