farmer
farmer  
पश्चिम महाराष्ट्र

रोजगार हमी योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या लाभापासून क वर्ग नगरपलिका कार्यक्षेत्रातील मंगळवेढयातील 2 हजार पेक्षा अधिक शेतकरी या योजनेतील लाभापासून जिल्हाप्रशासनाने कार्यवाही न केल्यामुळे तीन वर्षांपासून वंचित असून अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

या योजनेची सुरुवात 2005 च्या कायद्यान्वये झाली असून मजुरांना रोजगार व शेतकऱ्यांना कायम स्वरुपी मालमत्ता तयार व्हावी, या दृष्टीने शासनाने समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत वैयक्तीक व सार्वजनिक लाभाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी सुरु केलेल्या 11 कलमी योजनेतील अहिल्यादेवी सिंचन विहीर, शेततळे, गाव तलाव, रोपवाटीका, संजीवनी नाडेप, कंपोस्टिंग, शोषखडडा, गाव योजना, संजिवनी व्हर्मी कंपोस्टींग, शौचालय, फळलागवड, वृक्ष लागवड आदी प्रकारच्या वैयक्तीक व सार्वजनिक हिताच्या योजना राबविता येतात. जेणेकरून याचा लाभ अल्पभुधारक शेतकऱ्याला होवू शकतो. क वर्ग नगरपरिषद क्षेत्रात ही योजना राबविण्याच्या संदर्भात मग्रारोहयो 2012 /प्र.क्र: 55 रोहयो 10, नियोजन विभाग /रोहयो शासन निर्णय 3 मार्च 2014 होवून ही क वर्ग नगरपलिका असलेली मंगळवेढयात ही योजना अद्यापही राबविण्यात आली नाही.

जॉबकार्डच्या माध्यमातून शहराच्या परिसरातील भूमीहीन मजुराला रोजगार व दोन हजारापेक्षा अधिक अल्पभूधारक शेतकय्राला याचा लाभ मिळू शकला नसल्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाबददल संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत 17 नोव्हेबर रोजी पत्रान्वये उपजिल्हाधिकारी सोलापूर यांना मजूर जॉबकार्डसाठी मागणी करित असून नगरपरिषद क्षेत्राचा समावेश करावा अशी मागणी केली. पण जिल्हा स्थरावरून याबाबत अद्यापही हालचाल झाली नाही.

ग्रामपंचायायतीकडील अल्पभूधारक शेतकय्राला या योजनेचा लाभ मिळतो. मग क वर्ग नगरपलिकेच्या बाबतीत शासननिर्णय होवूनही या कार्यक्षेत्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अन्याय का? सहा महिने झाले मागणी करूनही अदयापही जॉबकार्ड मिळाले नाही योजनेची अंमलबजावणी करण्यास विलंब का.
- आनंद इंगळे, शेतकरी मंगळवेढा

या योजनेतून शहर परिसरातील शेतकय्रांला लाभ मिळावा रोहयो विभागाशी पत्रव्यवहार केला असून अजूनही कार्यवाही न झाल्यास संबंधीत खात्याच्या मंत्री महोदयाला भेटून प्रयत्न करणार आहे.
- अरूणा माळी नगराध्यक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT