Voter-list
Voter-list 
पश्चिम महाराष्ट्र

चौथ्या दिवशी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - तांत्रिक कारणामुळे रखडलेली महापालिका प्रभाग 14 क च्या पोटनिवडणुकीसाठीची प्रारुप मतदार यादी अखेर मंगळवारी प्रसिद्ध झाली. दुपारी ती ऑनलाईन अपलोड करण्यात आली. 

दरम्यान, फेब्रुवारी 2017च्या तुलनेत आता तब्बल 2288 नवमतदारांची भर पडली आहे. यादी प्रसिद्ध होण्यास विलंब होत असल्याबद्दल "सकाळ'मध्ये आज (मंगळवारी) बातमी प्रसिद्ध झाल्यावर निवडणूक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करून आयोगाकडून यादी उपलब्ध करून ती अपलोड केली. 

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार, 17 फेब्रुवारी रोजी यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ती वेळेत प्रसिद्ध होऊ शकली नाही. यादी उपलब्ध करून घेण्यासाठी महापालिका निवडणूक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सातत्याने राज्य निवडणूक आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. ही यादी निवडणूक कार्यालयात तसेच solapurcorporation.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आली आहे. 

महापालिका प्रभाग 14 क मधील कॉंग्रेसचे नगरसेवक रफीक हत्तुरे यांचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. राज्यातील पाच महापालिकांतील आठ ठिकाणच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने 7 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी 1 जानेवारी 2018 ही अर्हता दिनांक निश्‍चित धरून आणि 10 जानेवारीपर्यंत अस्तित्वात असलेल्या यादीवर आधारीत प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार आता 2288मतदार वाढले आहेत. 

मतदार यादीचा तुलनात्मक तक्ता 
वर्ष स्त्री पुरुष एकूण 

2017 14,002 14,712 28,714 
2018 15,194 15,808 31,002 
----------------------------
वाढ 1192 1096 2288

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT