पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात अवघ्या 1900 शेतकऱ्यांची तूर खरेदी 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर  - राज्य पणन विभागाने तूर खरेदीसाठी यंदाही जिल्ह्यात आठ ठिकाणी खरेदी केंद्रे उघडली आहेत. या केंद्रांमार्फत तुरीची सध्या खरेदीही सुरू आहे; पण या खरेदी केंद्रांना अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात आतापर्यंत तूर खरेदीसाठी 9411 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी फक्त 1906 शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली आहे. त्यावरून शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात येतो. 

यंदा खरेदी व्यवस्थापनासाठी पणन विभागाने "ऍप'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नावनोंदणी सक्तीची केली. नावनोंदणी करूनदेखील शेतकऱ्यांच्या तूर विक्रीचा प्रश्‍न सुटलेला नाही. सोलापूर जिल्ह्यात 4 फेब्रुवारीपासून तूर खरेदी केंद्राचा प्रारंभ झाला. सुरवातीला प्रतिहेक्‍टरी साडेपाच क्‍विंटल तुरीचा कोटा देण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक झाली. या कोट्यात नंतर साडेआठ क्विंटल व गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी आता दहा क्‍विंटलची मर्यादा देण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांच्या विक्री कोट्यात वाढ झाल्याने तूर खरेदीचा वेग वाढेल, असा विश्‍वास पणन विभागाने व्यक्त केला आहे. पण रखडलेले एकूण चित्र पाहता ही खरेदी वाढेल, अशी शक्‍यता कमीच आहे. यंदाच्या हंगामात तुरीला 5450 रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव निश्‍चित झाला आहे. पण आतापर्यंत खरेदी झालेल्या शेतकऱ्यांना पैसे काही मिळालेले नाहीत, त्यामुळे यंदा पुन्हा तूर खरेदीचा हा विषय चर्चेला येण्याची शक्‍यता आहे. 

केंद्रनिहाय झालेली तूर खरेदी (क्विंटल) व कंसात शेतकऱ्यांची संख्या ः अक्कलकोट : 1811 (137), बार्शी : 1914 (188), दुधनी : 1600 (121) , करमाळा : 1927 (204) , कुर्डुवाडी : 6567 (737), माळकवठे : 2476 (193), मंगळवेढा : 1639 (143) , सोलापूर : 2234 (183)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT