Govind Karjol Sakal
पश्चिम महाराष्ट्र

न्यायालय निकालानंतरच म्हादाईचे काम सुरु केले जाईल; गोविंद कारजोळ

कळसा-भांडूरा (म्हादाई) योजनेचा निकाल सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या बाजूने लागल्यानंतर काम सुरु केले जाईल, अशी माहिती पाठबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांनी आज (ता.६) पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - कळसा-भांडूरा (म्हादाई) योजनेचा निकाल सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या बाजूने लागल्यानंतर काम सुरु केले जाईल, अशी माहिती पाठबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांनी आज (ता.६) पत्रकार परिषदेत दिली. कळसा भांडूरा योजना सध्या न्यायप्रविष्ठ आहे. दावा सर्वोच्च न्यायालयात आहे. निकाल हाती आल्यानंतर पहिल्यांदा भागाशः विकास कामे सुरु केली जातील. पण, सध्या काम हाती घेणे शक्य नाही. परंतु, निकाल हाती मिळताच दुसऱ्या दिवसांपासून काम सुरु करण्याची तयारी राज्याची आहे. राज्य सरकारने ५ टीएमसी पाणी पिण्यासाठी आणि उर्वरित पाणी विद्युत उत्पादनासाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव असल्याचे कारजोळ यांनी स्पष्ट केले.

कारजोळ पुढे म्हणाले,‘‘कळसा भांडूरा योजनेसाठी पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून २०१५ मध्ये ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. पण, या संदर्भात गोवा आणि महाराष्ट्र सरकारकडून हरकत दाखल करण्यात आली आहे. म्हादाईचे काम सुरु करण्यास राज्य सरकारला स्वारस्य आहे. पण, सदर विषय न्यायालयात असल्यामुळे काम करणे शक्य नाही. राज्याच्या बाजूने निकाल मिळाल्यानंतर तातडीने काम सुरू करू.’’

कुमारस्वामी टीका करणे थांबवावे

देशाच्या एकतेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करते. आरएसएस वर टीका आणि त्याला वेगळा रंग देणे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व सिध्दरामय्या यांनी थांबवावे. तथ्यहिन आरोप करून जनतेची दिशाभूल करु नये, अशी मागणी केली. दसरा व कित्तूर उत्सवाच्या धर्तीवर यंदा कित्तूर उत्सव तीन दिवस चालेल, अशी माहिती पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT