Milk
Milk 
पश्चिम महाराष्ट्र

दूध दराची घडी विस्कटलेलीच...

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - वाढलेले चाऱ्याचे दर, मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसणाऱ्या पशुखाद्याचा भार, चारा आणि पाण्याचा प्रश्न या चरख्यात दूध उत्पादक शेतकरी अडकत असतानाच, आता दुधाचे दरही सरासरी १९ ते २३ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले असून, शेतकऱ्यांपुढे आता जनावरे विकण्याचा पर्यायच उपलब्ध आहे. 
शेतकऱ्यांनी पूर्वीपासून शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध धंदा सुरू ठेवला आहे.

मात्र, त्याला आता ग्रहण लागत आहे. बाजारातील दूध विक्रीचे दर आणि शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दरात मोठी तफावत झाली आहे.

सध्या चाऱ्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ओल्या चाऱ्याबरोबरच वाळका चाराही जनावरांना द्यावा लागत असल्याने तो खरेदी करणे शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर जात आहे. त्यातच पशुखाद्याचे दर गेल्या काही महिन्यांत ३० टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळेच शेतकरी जनावरांना खर्च घालून मेटाकुटीला आला आहे. काही ठिकाणी तर जनावरांना पाणीही विकत घेऊन द्यावे लागत आहे. त्यामुळेही त्यांचा खर्च वाढला आहे.

एवढे सर्व व्याप करून दुधाला दर मात्र खर्चाच्या तुलनेत मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी जनावरे विकावी, की काय असाच विचार सुरू केला आहे. 
दूध दरवाढीसाठी मध्यंतरी आंदोलन झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनीही संप पुकारला. त्या वेळी शासनाने २७ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र आहे. शासनाकडून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणाही करण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी ते अनुदान बंद करण्यात आले.

त्यासंदर्भात सर्व पातळ्यांवर उठाव झाल्यानंतर शासनाला त्याची दखल घ्यावी लागली. त्यानुसार शासनाने प्रतिलिटर तीन रुपये देण्याचे धोरण घेतले आहे. मात्र, सध्या प्रतिलिटर १९ ते २३ रुपये दर दिला जात आहे आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याला एक लिटर दुधासाठी १७ ते १९ रुपये खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

जनावरांचा चारा, पशुखाद्यांचे दर ज्या प्रमाणात वाढतात, त्या प्रमाणात दुधाचे दर वाढत नाहीत. ते कमीच होत आहेत. बाजारात तर दुधाची ५० रुपयांवर विक्री केली जाते आणि आमच्याकडून १७ ते २१ रुपयांनी दूध खरेदी केली जाते. जोपर्यंत हा विरोधाभास दूर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळणार नाहीत. शासनाने याकडे लक्ष घालून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा दूध उत्पादक शेतकरी मोडून पडेल.
- सुनील कणसे, शेतकरी, शेणोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT