Milk
Milk 
पश्चिम महाराष्ट्र

#MilkAgitation पहिल्या दिवशीच पावणेपाच कोटींचा फटका

हेमंत पवार

कऱ्हाड - दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दुधाचा एक थेंबही मुंबईला जावू न देण्याच्या एल्गारानंतर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सक्रिय झाल्याने जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दूध संघांनीही आजचे दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संघांकडे येणाऱ्या सुमारे २३ लाख ५८ हजार ४०० लिटर दुधापैकी केवळ दोन ते तीन टक्के अपवाद वगळला दूध संकलन झाले नाही. त्यामुळे चार कोटी ७५ लाखांवर नुकसान सोसून संघांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनाला पाठिंबा दिला.   

‘स्वाभिमानी’ने दुधाला प्रति लिटर पाच रुपये वाढवून मिळावे, या मागणीसाठी आजपासून दूध दराचे आंदोलन हाती घेतले आहे. त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी गावोगावी रान उठवत जनजागृती केली. त्याला शेतकरी आणि दूध संस्थांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक गावांतील शेतकऱ्यांनी स्वतःहून डेअरीस दूधच न घालण्याचा निर्धार केला. आंदोलनाचा एक भाग म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दूध संघांनाही आंदोलन काळात शेतकरी, दूध डेअरींकडून दूध संकलन न करता आंदोलनास पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक दूध संघांनीही ‘स्वाभिमानी’च्या आवाहनाला प्रतिसाद देत आजचे दूध संकलन बंद ठेवले. त्यामुळे संघांकडे दूध संकलन झाले नाही. शेतकऱ्यांपासून दूध संघांपर्यंत दूध येण्यासाठी कार्यरत असलेली चेनच आज फिरली नाही. त्यामुळे दूध संघांनीही कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसून दूध आंदोलनाला पाठिंबा दिला. संघांच्या पदाधिकाऱ्यांनीही शेतकरी हितासाठी दूध संकलन बंद ठेवल्याचे सांगितले.

प्रशासनाचे दूध संकलनाचे आवाहन
दूध न मिळाल्याने ग्राहकांची होणारी गैरसोय विचारात घेऊन प्रशासनाने दूध संघांनाही दूध संकलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यासंदर्भातील पत्रेही संघांना देण्यात आली आहेत. त्यामुळे दूध संघांची इकडे आड अन्‌ तिकडे विहीर अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

आकडे बोलतात...
 रोजचे दूध संकलन - २३ लाख ५८ हजार ४०० लिटर  
 अंदाजे किंमत - ४ कोटी ७५ लाख ६८ हजार 
 पॅकिंगसाठीचे दूध - ४ लाख २७ हजार ३०० लिटर  
 मुंबईला टॅंकरने जाणारे दूध - ५ लाख ३३ हजार २०० लिटर
 पावडरसाठी वापर - १२ लाख २२ हजार ७०० लिटर 
 उपपदार्थ निर्मितीसाठी - ४४ हजार ९०० लिटर 
 शासनाला दूध पुरवठा - ९ हजार २०० लिटर 
 ‘महानंद’ संघाला - २२ हजार ८०० लिटर  
 अन्य राज्यांत विक्रीसाठी - ९८ हजार ३०० लिटर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT