पश्चिम महाराष्ट्र

‘गोकुळ’ मल्टिस्टेटसाठी केंद्र मंजुरी देऊ शकते

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ मल्टिस्टेट होण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने जरी ‘ना हरकत’ (एनओसी) दिली नाही, तरीही केंद्र सरकार याला मंजुरी देऊ शकते, अशी माहिती महसूल आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्यासह कोल्हापूरमधील विविध प्रश्‍नांबाबत संभाजीनगर येथील श्री. पाटील यांच्या घरी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

लोकसभेसाठी शिवसेनेचा प्रचार करताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा जीव ‘गोकुळ’मध्ये अडकला असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील यांनी महाराष्ट्र शासन ‘गोकुळ’ संघ मल्टिस्टेट होऊ देणार नाही, असे जाहीर केले होते. त्यानंतर जिल्ह्यात गोकुळ केंद्रस्थानी ठेवून सुरू असलेल्या राजकारणाला चांगलीच धार आली होती. यातच कर्नाटक सरकारने ‘गोकुळ’ने मागितलेली ‘ना हरकत’ नाकारली आहे. आता महाराष्ट्र शासन कोणता निर्णय घेणार, या प्रश्‍नावर ते बोलत होते.  

श्री. पाटील म्हणाले, गोकुळ हा जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांचा संघ आहे आणि तो तसाच राहावा. यामध्ये कोणाला विरोध करायचे कारण नाही. कर्नाटक सरकारने ना हरकत (एनओसी) नाकारली आहे. महाराष्ट्र शासनही त्याला मंजुरी देणार नाही. असे असले तरीही केंद्र सरकार काय करणार, याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण मल्टिस्टेटच्या कायद्यात राज्यांनी मंजुरी न देताच केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते. केंद्र निर्णय देणार किंवा नाही? केंद्राने दिलेल्या निर्णयाविरुद्ध पुन्हा न्यायालयात दाद मागितली जाईल, हा पुढचा प्रश्‍न आहे.

सत्ता राहिली तर..आणि राहीलच
राज्यात आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे. दरम्यान, २३ मे नंतर सत्ता राहिली तर नक्कीच ‘गोकुळ’ मल्टिस्टेटचा प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही देत सत्ता राहिली तर म्हणणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्ता राहीलच अशी तत्काळ दुरुस्तीही केली.

दादांची गुगली... 
राज्याकडून मंजुरी मिळणार नाही म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी केंद्र निर्णय करू शकते, असे सांगून कोल्हापूरच्या राजकारणात गुगली टाकली आहे. या गुगलीवर आता कोण सिक्‍सर मारणार, कोण आऊट होणार, हे लवकरच समजणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT