Pandharpur
Pandharpur 
पश्चिम महाराष्ट्र

गृहनिर्माण मंत्र्यांनी 1100 लोकांना घडवले विठ्ठल दर्शन

भारत नागणे

पंढरपूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. ऐन निवडणूकीत अनेक वेळा सर्वसामान्य मतदारांशी संपर्क साधणे जिकरीचे होते. मतदारांना निवडणूकीपूर्वी आकर्षित करण्यासाठी राजकीय नेते अनेक शक्कल लढवताना दिसतात.

असे असतानाच केंद्रात आणि राज्यातील सत्ताधीश आणि आगामी लोकसभा निवडणूकीत 300 प्लसचा पल्ला गाठण्यासाठी भाजप मंत्री सरसावले आहेत. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आपल्या घाटकोपर विधानसभा मतदार संघातील 1100 मतदारांना आज सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची विशेष सोय करण्यात आली. त्यांनी सर्व मतदारांसाठी मुंबई ते कुर्डूवाडी आणि कुर्डूवाडी या रेल्वे प्रवासासाठी स्वतंत्र रेल्वे बुक केली.

कुर्डूवाडी ते पंढरपूर या प्रवासासाठी विशेष गाड्याचा ताफा दिमतीला ठेवला होता. आलेल्या सर्व मतदार राजासाठी मंत्री महोदयांनी खाण्याची राहण्याची सोय केली होती. मात्र मंत्री असतानाही त्यांनी व्हीआयपी दर्शनाचा लाभ न घेता आलेल्या 1100 मतदारांना दर्शन रांगेतून विठ्ठलाचे दर्शन घेतले.

तसे पाहिले तर विठ्ठल आणि रुक्मिणी माता ही शेतकरी ,कष्टकरी यासह सर्वानाच भरभरून आर्शिवाद देणारी मानली जाते. त्यामुळे या मतदार राजांना पंढरीनाथाचे दर्शन घडवून आपल्या पदरात मताचे दान पडणार का हे जरी आता स्पष्ट झाले नसले तरी आचारसंहिता जाहीर होईपर्यंत अनेक इच्छुक आपल्या मतदारांना तिर्थाटनाचा लाभ घडवून आणतील असे म्हटले वावगे ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT