Maratha Reservation
Maratha Reservation 
पश्चिम महाराष्ट्र

'मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मंत्री पदाचा राजीनामा देणार'

सकाळवृत्तसेवा

सोलापूर- पुढील वर्षी होणाऱ्या आषाढी एकादशीपूर्वी जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली आहे. राज्यभर मराठा समाजाच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर आंदोलकांनी शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

आज सहकारमंत्री देशमुख पंढरपूरला जात असताना माचणूर (ता. मंगळवेढा) येथे त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काय-काय करत आहे, त्याची सर्व माहिती त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आंदोलनकर्त्यांचे फोनद्वारे बोलणे करून दिले. सर्व मराठा समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाहीही यावेळी सहकारमंत्री देशमुख यांनी दिली. आषाढीच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलकांनी शांतता राखण्याचे आवाहन सहकारमंत्र्यांनी केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT