Miracle: This person is still alive after death
Miracle: This person is still alive after death 
पश्चिम महाराष्ट्र

चमत्कार ः ही व्यक्ती मृत्यूनंतरही आहे जिवंत, अजून धडधडतंय ह्रदय

नीलेश दिवटे

कर्जत : जन्माला आलेला प्रत्येकजण मरतोच. प्रत्येकाच्या आयुष्यात मृत्यूचा दिवस उगवतोच. त्यातून असे म्हणतात की, आप मेला जग बुडाले. आपण एकदा देह सोडून गेलो की मागे काही उरत नाही. परंतु ही धारण हल्ली खोटी ठरत आहे. मेल्यानंतरही जिवंत राहता येते. हे कर्जत तालुक्यातील एका गृहस्थाने दाखवून दिले आहे. त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल पाचजणांना जीवदान दिले आहे.

दामू गायकवाड आहेत बारडगावचे...

तालुक्यातील बारडगाव सुद्रिक या गावाचे दामू पंढरीनाथ गायकवाड यांनी ही किमया साधली आहे. ते पुणे येथे ताडीवाला रोड परिसरात राहत होते. दौंड येथे बहिणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिकडे गेले होते. त्यानंतर परतताना चक्कर येऊन ते कोसळले.

मेंदू गेला मृतावस्थेत

या घटनेनंतर त्यांना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करूनदेखील त्यांचे प्राण वाचू शकले नाही. त्यांचा मेंदू मृतावस्थेत गेल्याचे त्यांनी सांगितले. आठ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. ते अधिकच ढासळत गेली. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

मरणानंतरही ते पाहताहेत
त्यांनी अवयवदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या इच्छेनुसार रुबी हॉल क्लिनिक येथेच त्यांचे अवयव दान करण्यात आले. त्यांचे हृदय, डोळे, किडनी, फुफ्फुस चांगले असल्याने ते इतर रुग्णांना बसविण्यात आल्याने त्यांच्या जीवनात प्रकाश आला आहे. दामू गायकवाड यांचे हृदय दिल्ली येथील फोर्टीस हॉस्पिटलमधील महिलेस देण्यात आले.

फुफ्फुस व यकृताचे मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील रुग्णास, तसेच एक किडनी रुबी हॉल क्लिनिकमधील रुग्णास व दुसर्‍या किडनीचे ससून हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले.

इच्छा पुरी केली

कै. दामू गायकवाड यांची अवयव दान करण्याची इच्छा होती. ती खर्‍या अर्थाने पूर्ण झाली आहे. कै. दामू गायकवाड यांच्या इच्छेनुसार बंधू बंडू गायकवाड व भाचे गौतम आढाव यांनी अवयवदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी तातडीने हालचाल केल्यामुळेच 5 रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.

दामू गायकवाड इहलोकात नसले तरी त्यांच्यामुळे पाचजणांना जीवदान मिळाले आहे. ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला हे अवयव मिळाले, त्यांच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्यामुळे गायकवाड यांचा मृत्यू झालाय असे तरी कसे म्हणावे.... 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT