Crime-Story sakal
पश्चिम महाराष्ट्र

मिरज : मारहाणीतील शेतकऱ्याचा मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा

भोसे उधारीसाठी खत विक्रेत्याकडून मारहाण

सकाळ वृत्तसेवा

मिरज : तालुक्यातील भोसे येथे शेती औषधे आणि खते विक्री करणाऱ्या दुकानदाराने उधारी वसुलीसाठी शेतकऱ्याला केलेल्या मारहाणीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आज (ता. ३१) भोसे येथील शेती औषधे विक्रेते सुधीर कुमार चौगुले आणि त्याच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अजितकुमार जयकुमार गणेशवाडे (वय ६५) असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, भोसे गावातील शेतकरी अजितकुमार हे गेल्या अनेक वर्षांपासून सुधीर चौगुले यांच्या महावीर चौकातील संजीवनी कृषी औषध केंद्र या दुकानातून शेतीसाठीची औषधे आणि खते विकत घेत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना या खरेदी केलेल्या औषधे आणि खतांच्या उधारीची परतफेड करणे जमले नाही. त्यामुळे या उधारी वसुलीसाठी २७ सप्टेंबर रोजी खत विक्रेते सुधीर चौगुले आणि जयकुमार गणेशवाडे यांची किरकोळ बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान मारामारीत झाले आणि जयकुमार गणेशवाडे यांना विक्रेते अजित चौगुले यांनी रस्त्यावर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत जयकुमार गणेशवाडे या शेतकऱ्याच्या पोटामध्ये गंभीर दुखापत झाली. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीचे शस्त्रक्रिया करण्यात आली ही शस्त्रक्रियाही यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खालावली आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तेथेच त्यांचा उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी निधन झाले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस आणि खत विक्रेते सुधीर चौगुले आणि त्यांच्या अल्पवयीन मुलाला विरुद्ध मृत्यूस जयकुमार गणेश कवडे यांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी आज गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT