MKCL has made changes in MS-CIT curriculum
MKCL has made changes in MS-CIT curriculum 
पश्चिम महाराष्ट्र

एमएस-सीआयटी आता देणार जॉब रेडीनेस!

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - आधुनिक युगात संगणक प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला असून भविष्याचा वेध घेऊन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एमकेसीएलने एमएस-सीआयटीच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. काळानुरूप बदल करत अभ्यासक्रमात माहिती- तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या विषयांचा समावेश केल्याची माहिती एमकेसीएलचे विभागीय समन्वयक महेश पत्रिके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

प्रत्येक नागरिकाला संगणकाची ओळख व्हावी या उद्देशाने एमकेसीएलने एमएस-सीआयटी या शासनमान्य अभ्यासक्रमाची सुरवात केली होती. बदलत्या काळानुरूप या अभ्यासक्रमात बदल करून आयटी साक्षरतेचे नऊ स्तंभ दिले आहेत. ज्यात आता महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, प्रोफेशन आणि व्यावसायिक लोकांना जॉब रेडी होण्यासाठी कौशल्य प्राप्त होणार आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) हा पदवी शिक्षण अभ्यासक्रमही सुरू केला आहे. यात विद्यार्थ्यांना शिकताना नोकरीचा अनुभवही घेता येणार आहे. याबरोबरच इतरही नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. तसेच इंग्रजी संवाद कौशल्ये व मृदु कौशल्ये या विषयांचे प्रशिक्षण देणारा नवीन क्‍लिक इंग्लिश हा कोर्स सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच व्यावहारिक क्षेत्रात यश मिळवून देण्यासाठी, त्यांना जॉब रेडी करण्यासाठी एमकेसीएलने विविध अभ्यासक्रमांची रचना केल्याचे श्री. पत्रिके यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस एमकेसीएलचे जिल्हा व्यवस्थापक रोहित जेऊरकर, प्रताप भोसले, हारुण शेख, शिवानंद पाटील आदी उपस्थित होते.  

हे सर्व कोर्स कौशल्यावर अधारीत असून 3 महिने कालावधी आहे. सोलापूर जिल्ह्यात 135 सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत रोज तास तास हे प्रशिक्षण असेल. सर्वच अभ्यासक्रमांची फि तीन हजार आठशे रुपये आहे. अभ्यासक्रमांमधून सायबर सुरक्षेबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

SCROLL FOR NEXT