MLA lahamate told his school memories 
पश्चिम महाराष्ट्र

आमदार रमले शालेय आठवणीत

सकाळ वृत्तसेवा

अकोले : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे नुकतेच शालेय आठवणींत रमले होते. निमित्त होते, मॉडर्न हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या पारितोषिक वितरण समारंभाचे! 

मॉडर्न हायस्कूलमध्ये आमदार डॉ. लहामटे यांनी पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतले होते. माजी विद्यार्थी असणारे डॉ. लहामटे आता प्रमुख पाहुणे म्हणून शाळेत गेले होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. कोणत्या वर्गात बसलो, शाळेत केलेल्या गमती-जमती व खोडी, शाळेतील आवडीचा विषय, शिकताना झालेल्या चूका नि त्याचा भावी आयुष्यात झालेला फायदा, जास्तीत जास्त केलेला अभ्यास, तसेच वसतिगृहातील दिवस, मल्लखांब खेळातील किस्से सांगताना ते बालपणीच्या आठवणींत हरवून गेले होते. विद्यार्थ्यांनो, मोठी स्वप्ने पाहायला शिका. अपयश हा यशाच्या मार्गातील अडथळा कधीच असू शकत नाही, असा सल्ला त्यांनी दिला. 

माजी विद्यार्थीच करतील संस्थेला मोठे 

हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी म्हणाले, की मराठी माध्यमांच्या शाळांपुढे मोठी आव्हाने आहेत. अशा वेळी तब्बल 22 शाळांमधून 21 हजार विद्यार्थी हिंद सेवा मंडळात शिक्षण घेतात. संस्था नेहमीच नवनवीन उपक्रम राबविते. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या आव्हानांवर मात करीत आहेत, याचा अभिमान वाटतो. वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आमदार लहामटे यांचा आदर्श घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिक्षण क्षेत्रात भांडवलदार उतरल्याने गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यावर गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच उत्तर आहे. आमदार लहामटे यांच्यासारखे माजी विद्यार्थीच संस्थेला मोठे करतील, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला. 

प्राचार्य संतोष कचरे यांनी अहवालवाचन करताना, शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला. रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड, हिंद सेवा मंडळ पतसंस्थेचे अध्यक्ष आदिक जोशी, हिंद सेवा मंडळ सेवक प्रतिनिधी कल्याण लकडे, शालेय समितीचे अध्यक्ष सतीश बुब, ज्यूनियर कॉलेजचे अध्यक्ष दिलीप शहा व्यासपीठावर होते. सूत्रसंचालन गणेश जोशी व विशाल जाधव यांनी केले. पर्यवेक्षिका सविता मुंदडा यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

सोनी BBC अर्थने धर्मेश बरई यांचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव केला

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT