पश्चिम महाराष्ट्र

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी यांचे नाव पुढे !

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते. 

विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असली, तरीही इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. सुजितसिंह ठाकूर, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावांचीही चर्चा आहे. तरीही हाळवणकर यांना श्रेष्ठींनी शब्द दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई अध्यक्षांचाही शोध होणार
मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून मंत्री आशिष शेलार यांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी सलग दोन वेळा या पदाला योग्य न्याय दिला आहे. तिसऱ्या खेपेस त्यांना संधी मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून तरतूद करावी लागणार आहे, तरीही या पदासाठी खासदार मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, आमदार पराग आळवणी आदींची नावे चर्चेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT