पश्चिम महाराष्ट्र

पन्हाळा : महापुरातील भरपाईसाठी मनसेचे दंडवत आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा

आपटी - पावसामुळे पिकांचे व घरांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासन किती नुकसान भरपाई देणार, गड किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयाविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पन्हाळा येथील बाजीप्रभू पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत दंडवत घालत आंदोलन केले.

तहसीलदार रमेश शेंडगे यांना निवेदन दिले. जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील व विभाग प्रमुख विशाल मोरे बाजीप्रभू यांच्या पुतळ्यापासून दंडवत घालत हलगी व कैचाळाच्या गजरात तहसील कार्यालयासमोर आले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. अद्याप शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई देणार ते जाहीर केलेले नाही.

भरपाई देत असताना बागायत शेतकऱ्यास प्रतिगुंठा 2500 तर जिरायतसाठी प्रतिगुंठा 1000 रुपये याप्रमाणे द्यावी. भरपाई थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यापर्यंत पोहचवावी. गड किल्ले भाड्याने देण्याच्या बाबतीत घेतलेला निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. आंदोलनात नयन गायकवाड, रमेश मेनकर, मोहन शेळके, पांडुरंग पाटील, कृष्णात दिंडे व कार्यकर्ते उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT