sangli sakal
पश्चिम महाराष्ट्र

विरोधकांची मोट बांधण्यासाठी हालचाली

जयंत पाटलांसमोर आव्हान ; विविध कर्ज प्रकरणे प्रचारात गाजणार

घनश्‍याम नवाथे

सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका दिवाळीनंतर उडणार आहे. चार राजकीय पक्षांनी दारूगोळा जमा केला आहे. भाजप-शिवसेनेने स्वबळाचा बार उडवण्याची घोषणा केली आहे. तर बँकेवरील पकड कायम ठेवून बिनविरोधचा धमाका करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे डावपेच सुरू आहेत. जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ आणि त्याची बेरीज ते कशी जमवतात यावर निवडणुकीचे चित्र ठरेल. निवडणूक झालीच तर संचालकांशी संबंधित साडेपाचशे कोटींची कर्जे हाच मुद्दा गाजणार आहे.

जिल्हा बँकेत साधारण ४० वर्षापूर्वी सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांच्याकडे बँकेचे नेतृत्व होते. वसंतदादांनी त्यांच्याकडे धुरा सोपवली होती. तो काळ बँकेत राजकारण नाही असा होता. काळानुरुप बँकही राजकारणाचा अड्डा झाली आणि आज त्याचे स्वरुप आपण अनुभवत आहोत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या गटाने वर्चस्व सिद्ध केले. या काळात सारे काही शांत असताना ‘केन ॲग्रो’च्या कर्जप्रकरणावरून बँकेतील संघर्ष ऐन निवडणुकीच्या तोंडावर आला. एनपीएच्या उंबरठ्यावरील कर्जे हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. सुमारे साडेपाचशे कोटींची कर्जे संचालकांशी संबंधित संस्थाची आहेत. त्यामुळे संघर्ष टाळून बिनविरोधसाठी सर्वजण एकत्रित येतील असे चित्र आहे.

एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पूर्वीचीच मंडळी इच्छुक असली तरी नव्याने काही वजनदार मंडळी बँकेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या नेत्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

राजकीय पक्षानुसार बलाबल पाहिले तर राष्ट्रवादीचे १२, कॉंग्रेसचे सहा, भाजपा दोन आणि शिवसेना एक असे चित्र आहे. कॉंग्रेस, भाजपा आणि शिवसेना नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना जागा वाढवून हव्या आहेत. तशातच चारही पक्षात इच्छुक वाढलेत. त्यामुळे बँकेत विद्यमान काही संचालकांसह नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. जवळपास ७० टक्के जुनी मंडळी असतील तर ३० टक्के नवे चेहरे असतील.

जयंत पाटील यांना बँकेवर पकड कायम राहील का हे निवडणुकीनंतर ठरेल. त्यांच्याविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, खासदार संजय पाटील, विशाल पाटील, आमदार अनिल बाबर, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याही भूमिका निर्णायक असतील. आठवडाभरात अंतिम चित्र कळेल. संस्थात्मक बांधणीवरच या निवडणुकीचे यश ठऱते. विद्यमान काही संचालकांनी ती जुळणी आधीच केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत जागा वाटपावर पुढचे चित्र ठरणार आहे. जयंतरावांकडून सर्वांसोबत चर्चा आणि व्यूहरचना सुरू आहे. निवडणूक लागली तरी काही चेहरे कायमच असतील असे दिसते. जयंत पाटील ‘वेट ॲन्ड वॉच’ भूमिकेत दिसतात.

पवारांना साकडे

अर्ज भरण्यास आज सुरवात झाली आहे. तर माघारीसाठी ९ नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. त्यामुळे जवळपास २५ दिवस हे खलबतांसाठीच आहेत. दिवाळीनंतरच घडामोडी गतीमान होतील असे दिसते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे काहींनी साकडे घातले आहे. त्यामुळे ही निवडणूक जिल्ह्यापुरती सिमित राहिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT