MP-Supriya-Sule
MP-Supriya-Sule 
पश्चिम महाराष्ट्र

... तरीही मंत्री मात्र आमचेच असणार!

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : 'आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार येईल. आणि जरी दुसरे कोणाचे सरकार सत्तेत आले, तरी आमच्या पक्षातून तिकडे गेलेल्यांपैकी बरेच आमदार राज्य मंत्रिमंडळात मंत्री असतील,' असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासदार सुप्रिया सुळेही पुढील पंधरा दिवस महाराष्‍ट्रातील विविध 15 शहरातील लोकांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी (ता.23) त्या नगरमध्ये आल्या होत्या. त्यांनी व्यापारी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. 

पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, आमचे सरकार सत्तेत असताना वैयक्तिक कटुता नव्हती. मात्र, आता वैयक्तिक कटुता घेऊन कारवाईचा बडगा दाखवला जात आहे. सध्या सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नोटाबंदी नंतरही भ्रष्टाचार कमी झालेला नाही, हे त्यांच्याच मंत्र्यांनी केलेली वक्तव्ये आहेत. कारवाईच्या नावाखाली नेत्यांचा आवाज दाबला जात आहे. ईव्हीएमबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. नवीन तंत्रज्ञानाला माझा विरोध नाही, परंतु लोकांचेही मत जाणून घेतले पाहिजे. आपण मत कोणाला दिले आणि ते कोणाला मिळाले, याची खातरजमा करण्याचा अधिकार मतदारांना असलाच पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT