Mahavitaran
Mahavitaran 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर : वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा 

संतोष सिरसट

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना महावितरणनेही मोठा झटका देण्यास सुरवात केली आहे. शेतीपंपासाठी दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यात नियमितता राहिलेली नाही. वीजपुरवठा नेमका किती वाजता सुरू होणार, याची कल्पनाही शेतकऱ्यांना दिली जात नाही. एकूणच जिल्ह्यात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा झाल्याचे दिसून येते. 

मागील जवळपास एक महिन्यापासून "महावितरण'ने शेतीपंपाच्या वीजपुरवठ्यात कपात करण्यास सुरवात केली आहे. दिवसा आठ तास वीजपुरवठा करण्याच्या सूचना असतानाही शेतकऱ्यांना केवळ चार ते सहा तासच वीजपुरवठा देण्यात येत आहे. रात्रीच्यावेळी देण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यातही आता कपात केली आहे. पूर्वी रात्री दहा तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, बुधवारपासून (ता. 17) त्यामध्येही दोन तास कपात करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळीही शेतकऱ्यांना आता केवळ सहा तासच वीजपुरवठा शेतीपंपासाठी मिळत आहे. तो पुरवठाही नियमित नसल्याने शेतकऱ्यांमध्ये महावितरणबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. जिल्ह्यात यंदा केवळ सरासरी 38 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी कुणाकडेही उपलब्ध नाही. पाण्यासाठी वीजपुरवठा असणे गरजेचे आहे. पण, महावितरण तेवढाही वीजपुरवठा नियमित करू शकत नाही. त्यामुळे थोडे पाणी असूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. 

कर्मचाऱ्यांचे समुपदेशन गरजेचे 
महावितरणच्या उपकेंद्रामध्ये वीज सुरू आहे की नाही, तिची वेळ किती असेल हे सांगण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली असते. पण, ते कर्मचारी शेतकऱ्यांना व्यवस्थित बोलत नसल्याच्याही अनेक तक्रारी येतात. वीजपुरवठा बंद असलेल्या काळात त्याची चौकशी करण्यासाठी फोन केला तरी तो उचलला जात नसल्याचा प्रकार वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील उपकेंद्रामध्ये घडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या उपकेंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांशी कशा पद्धतीने बोलावे याबाबत समुपदेशन करणे गरजेचे आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT