municipality neglected towards women Sanitary room in Miraj city
municipality neglected towards women Sanitary room in Miraj city 
पश्चिम महाराष्ट्र

इथे महापालिकेची महिला स्वच्छतागृहांवर फुली

सकाळवृत्तसेवा

मिरज : स्वच्छतेचा बराच डांगोरा पिटणाऱ्या महापालिकेने मिरज शहरात महिलांसाठीच्या स्वच्छतागृहाच्या सुविधेवर फुली मारली आहे. केवळ महिलांसाठी स्वच्छतागृह बांधायचे असल्याने महापालिकेच्या तिजोरीत पैसा नाही. त्यासाठी सेवाभावी संस्थेने महिलांसाठी स्वच्छतागृह लोणी बाजारात बांधून दिले. पण त्याचाही योग्य वापर करण्याची मानसिकता महापालिकेतील पुरुषप्रधान प्रशासनाची नाही. त्यामुळेच शहरातील एकमेव महिलांसाठीचे लोणी बाजार परिसरातील स्वच्छताग्रहही हातगाडी चालकांच्या विळख्यात सापडले आहे.

महिलांकडून याचा वापरच होऊ नये म्हणून काही हात गाडी चालक या स्वच्छतागृहाच्या दारात हातगाड्या लावतात आणि येथे येणाऱ्या महिलांची टिंगल टवाळी करण्यापर्यंतही त्यांची मजल जाते. याशिवाय हातगाडी चालकांच्या संरक्षणाच्या उद्देशानेच एक कचऱ्याचा कंटेनर येथे ठेवण्यात आला आहे. सहाजिकच या कंटेनरची दुर्गंधीमुळेही महिलांकडून या स्वच्छतागृहाचा वापर होत नाही. 

मिरज शहरात महिलांसाठीचे एकही स्वच्छतागृह महापालिकेने बांधले नाही. तरीही त्याबाबत कोणालाही खंत ना खेद. गेल्या कित्येक वर्षांपासून शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याची सातत्याने ओरड होत असते. तरीही त्याकडे महापालिकेतील पुरुषप्रधान प्रशासन आणि कारभाऱ्यांनी सतत दुर्लक्ष केले आहे. यावर उपाय म्हणून काही सुज्ञ जाणकारानी रोटरी क्‍लबच्या माध्यमातून महापालिकेस हे एकमेव स्वच्छतागृह तीन वर्षांपूर्वी बांधून दिले.त्यासाठी दहा लाख रुपयांहून अधिक खर्च रोटरी क्‍लबने केला.

याठिकाणी अत्यंत चांगल्या सुविधा रोटरी क्‍लबने स्वच्छतागृहाच्या माध्यमातून महिलांना उपलब्ध करून दिल्या. परंतु त्याची देखभाल आणि योग्य वापर करण्यासाठी महापालिकेने यंत्रणा तयार केली नाही. केवळ येथील काही हात गाडी चालकांची सोय करण्यासाठी या स्वच्छताग्रहाची देखभाल आणि वापर या दोन्ही व्यवस्था प्रशासनातील काही कर्मचारी अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक हाणून पाडल्या. याला काही हातगाडी चालकांच्या पाठीशी असलेल्या नगरसेवकांचीच फूस होती. त्यामुळेच सध्या हे शहरातील महिलांसाठीचे एकमेव स्वच्छतागृह वापराविना पडून आहे. 

तीन महिला कारभारी असुनही 

महापालिकेच्या महापौर, उपायुक्त, आणि प्रभाग समिती चारच्या सभापतीपदी महिला असूनही या गंभीर समस्येकडे तिघींचेही लक्ष नाही.महिलांच्या टिंगल-टवाळीतुन काही विपरीत प्रकार घडल्यानंतरच याकडे लक्ष जाणार का? असाही सवाल काही महिलांकडून होतो आहे. 

संबंधितांना वठणीवर आणू 

येत्या 24 तासात हे स्वच्छतागृह महिलांसाठी महिलांच्या वापरासाठी खुले झाले नाही आणि तेथील अतिक्रमणधारकांना विरुद्ध कारवाई झाली नाही तर आम्ही महिलाच याबाबत कारवाई करु.जी येथील हातगाडी चालकांसह महापालिकेतील पुरुषप्रधान मानसिकतेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही वटणीवर आणणारी असेल. 

- रुक्‍मिणीताई आंबेगिरी, शहरप्रमुख, शिवसेना महिला आघाडी, मिरज 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT