पश्चिम महाराष्ट्र

आई-वडिलांनीच विष पाजून घेतला दोन महिन्याच्या बाळाचा जीव

सकाळवृत्तसेवा

शाहूवाडी - पहिली मुलगी असताना दुसरीही मुलगीच झाली. त्यामुळे चिडलेल्या आई आणि वडिलांनी पोटच्या दोन महिन्यांच्या मुलीला थेट थिमेट पाजून ठार मारले. सावर्डी  (ता. शाहूवाडी) येथील जयश्री प्रकाश पाडवे (वय 21) व प्रकाश बंडू पाडवे (28) यांनी हे निर्दयी कृत्य केले. या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी दोघांनाही अटक केली. न्यायालयाने त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की प्रकाश पाडवे व जयश्री पाडवे या दांपत्याला पहिली प्रांजल ही दोन वर्षांची मुलगी आहे. त्यानंतर त्यांना दोन महिन्यांपूर्वी मुलगी झाली. पहिली मुलगी असतानाही पुन्हा दुसऱ्यांदा मुलगीच झाल्याने या दांपत्याने सिद्धीला मारण्याचा कट रचला. 

४ ऑक्‍टोबर रोजी घरातच सिद्धीला खाण्यातून थिमेट हा विषारा पदार्थ पाजला. आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला काहीतरी झाल्याचे नाटक करत त्यांनी तिला दवाखान्यात नेले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सिद्धीचे शवविच्छेदन करण्याचे डॉक्‍टरांनी ठरविले; मात्र त्यावेळी मृत सिद्धीचे शवविच्छेदन करण्यास आई जयश्रीने विरोध केला. त्याच वेळी सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. स्वतः डॉक्‍टरांनी या वेळी याबाबत तक्रार दिली.

थिमेटचा पुरावा मिळणार नाही यासाठी पाडवे दांपत्याने चांगली खबरदारी घेतली; पण अखेर कोल्हापूर येथून आलेल्या फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात थिमेट हा विषारी पदार्थच सिद्धीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आज पाडवे दांपत्याविरोधात शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. याबाबतची तक्रार शाहूवाडीचे पोलिस उपनिरीक्षक मतादेव जठार यांनी दिली. पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे, पोलिस हवालदार धनाजी सराटे, भरत मोळके, पुष्पा कळके यांच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी केली.

जयश्रीने मृत सिद्धीचे शवविच्छेदन करण्यास विरोध केला. त्याच वेळी ती काहीतरी लपवत असल्याची शंका आली. त्यादृष्टीने तपास सुरू ठेवला. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरला आणि तपासाला यश आले.
- आर. आर. पाटील,
उपविभागीय पोलिस अधिकारी, शाहूवाडी 

वंशाला दिवा म्हणून...
सिद्धीचे वडील व आई अल्पशिक्षित आहेत. आई घरकाम करते, तर वडील प्रकाश पाडावे कोल्हापूर येथील बारमध्ये काम करतो. आई-वडिलांच्या या दुष्कृत्याने अवघ्या दोन महिन्यांच्या सिद्धीचा गळा घोटला गेला. वंशाला दिवाच हवा म्हणून हे कृत्य घडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT