Sachin Chavan Murder
Sachin Chavan Murder esakal
पश्चिम महाराष्ट्र

'खून का बदला खून से'! कुपवाडच्या गुंडाचा भरदिवसा पाठलाग करून खून; धारदार शस्त्रांनी डोक्यात सपासप वार

सकाळ डिजिटल टीम

कुपवाड (जि. सांगली) येथे २०२० मध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आणि कामगार कंत्राटदार दत्तात्रय महादेव पाटोळे यांच्या खुनाची घटना घडली होती.

जयसिंगपूर, सांगली : कुपवाड (जि. सांगली) येथील तरुणाचा उदगाव (ता. शिरोळ) येथे कोल्हापूर-सांगली महामार्गावर खोत पेट्रोल पंपासमोर (Petrol Pump) पाठलाग करून धारदार शस्त्रांनी सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. यावेळी हात आणि डोक्यात वार करण्यात आल्याने मनगट तुटले व बोटेही तुटून विखुरली. ही घटना पाहणाऱ्या अनेकांचा थरकाप उडाला.

सचिन अज्ञान चव्हाण (वय २४) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी (Police) पाठलाग करून साहिल अस्लम समलीवाले (वय २६, रा. वाघमोडेनगर, कुपवाड), परशुराम हनुमंत बिजंत्री (वय २५, रा. आलिशाननगर, कुपवाड) या दोघांना ताब्यात घेतले; तर अन्य काहींचा शोध सुरू आहे. चार वर्षांनंतर खुनाचा बदला घेतल्याची चर्चा कुपवाड परिसरात होती.

कुपवाड (जि. सांगली) येथे २०२० मध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आणि कामगार कंत्राटदार दत्तात्रय महादेव पाटोळे यांच्या खुनाची घटना घडली होती. या प्रकरणातील मृत सचिन चव्हाण हा अटकेत होता. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. त्याचे कुटुंबीय सध्या जयसिंगपूर येथील सुदर्शन चौकात राहात होते. गुरुवारी तो सांगलीहून जयसिंगपूरकडे येत होता. उदगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या खोत पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर मोटारसायकलवरून पाठलाग करणाऱ्या काही तरुणांनी त्याला मोटारसायकलवरून खाली पाडले.

हातात शस्त्र घेऊन येणाऱ्या तरुणांना पाहून आपल्यावर हल्ला होणार, याची जाणीव झाल्यानंतर सचिन चव्हाण हा जीव वाचविण्यासाठी धावपळ करू लागला. जवळच असणाऱ्या प्रभात फॅब्रिकेशनमध्ये तो शिरला. मात्र, मागोमाग आलेल्या हल्लेखोरांनी त्याला बचावाची संधी न देता त्याच्यावर सपासप वार करण्यास सुरू केले. डोक्यावर आणि हातावर सपासप वार करण्यात आले. वर्मी घाव लागल्याने सचिन चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला.

या हल्ल्यानंतर संशयित पळून गेले, मात्र कोल्हापूर-सांगली महामार्गावरून (Kolhapur-Sangli Highway) पेट्रोलिंग करणाऱ्या निर्भया पथकातील पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील, शैलेश पाटील, अमित मोरे, विक्रम मोरे यांनी पाठलाग करत दोघांना ताब्यात घेतले. अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्यानंतर पाहणाऱ्या अनेकांचा थरकाप उडाला. जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके तातडीने दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला. शिरोळ ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य केंद्रात मृत सचिन चव्हाणचे विच्छेदन करण्यात आले.

भरत त्यागी खून प्रकरणाची आठवण

काही वर्षांपूर्वी याच मार्गावर भरत त्यागी याचा पाठलाग करून गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्याच पद्धतीने सचिन चव्हाण याचा पाठलाग करून भरदुपारी तीष्ण हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आला. घटनास्थळी भरत त्यागी याच्या खुनाची आठवण अनेकांना झाली.

वैमनस्य सांगलीत, खून उदगावात

कुपवाड येथे दत्ता पाटोळे खून प्रकरणी मृत सचिन चव्हाण हा संशयित आरोपी होता. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. खुनाचा बदला घेण्यासाठीच हल्लेखोरांनी सचिन चव्हाणचा काटा काढला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. दरम्यान, भरत त्यागी खून प्रकरणाप्रमाणेच सचिन चव्हाण खून प्रकरणीदेखील वैमनस्य अन्य ठिकाणी आणि खून मात्र कोल्हापूर-सांगली महामार्गावर झाल्याचे स्पष्ट झाले.

कुपवाड येथील पाटोळे खून प्रकरणाच्या पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांच्या दक्षतेमुळे घटनेनंतर दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य संशयितांची नावे निष्पन्न होताच त्यांनाही अटक करू.

-डॉ. रोहिणी सोळंके (उपविभागीय पोलिस अधिकारी, जयसिंगपूर)

पार्श्वभूमी पाटोळेंच्या खुनाची

मृत पाटोळे हे मिरज औद्योगिक वसाहतीमधील सह्याद्री स्टार्चमध्ये कर्मचारी पुरवत होते. कामगार कंत्राटदार आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून ते सर्वत्र परिचित होते. १० जुलै २०२० रोजी दैनंदिन कामानिमित्त ते मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळी गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास तेथून ते कुपवाडकडे दुचाकी (एमएच १०, डीसी ७००२) वरून येत होते. मिरज आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीच्या सीमेवर हॉटेल अशोकासमोर ते आले. त्यावेळी पाठलागावर असलेल्या संशयित पाचही जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. पाटोळे यांनी दुचाकी बाजूला टाकून जीवाच्या अकांताने समोरच असलेल्या रोहिणी ॲग्रोटेक कोल्डस्टोअरेजमध्ये धाव घेतली.

पाठोपाठ हातात धारदार शस्त्रे घेऊन संशयित धावले. थेट डोक्‍यावर तलवार व कोयत्याचे वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुख्य संशयित नीलेश विठोबा गडदे (वय २१, वाघमोडेनगर, कुपवाड), सचिन अज्ञान चव्हाण (२२, आर. पी. पाटील शाळेजवळ, कुपवाड), वैभव विष्णू शेजाळ (२१, विठुरायाचीवाडी, कवठेमहांकाळ, सध्या रा. वाघमोडेनगर), मृत्युंजय नारायण पाटोळे (२७, आंबा चौक, यशवंतनगर), किरण शंकर लोखंडे (१९, वाघमोडेनगर) यांना जत तालुक्‍यातील जिरग्याळ येथून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर संशयित कारागृहात होते. या खुनानंतर दोन गटांत धुसफूस सुरूच होती. मुख्य संशयित गडदे वगळता अन्य संशयित जामिनावर बाहेर होते.

‘खून का बदला खून से’

कुपवाड येथे दत्ता पाटोळे खून प्रकरणी मृत सचिन चव्हाण हा संशयित आरोपी होता. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. खुनाचा बदला घेण्यासाठीच हल्लेखोरांनी सचिन चव्हाणचा काटा काढला. पाटोळे यांचा खून ज्या पद्धतीने पाठलाग करून करण्यात आला. अगदी त्याच पद्धतीने सचिनचा खून झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT