Crime
Crime 
पश्चिम महाराष्ट्र

महिलेच्या अंगावर राख टाकून टोकदार शस्त्राने हल्ला

सकाळवृत्तसेवा

सांगली - येथील जुना धामणी रस्त्यावर एका दुचाकीस्वाराने महिलेच्या अंगावर राख टाकून टोकदार शस्त्राने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. काल रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अमृता रहाटे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पंधरा दिवसांत दोन तरुणीसह चौघींवर हाच दुचाकीस्वार हल्ला करत असल्याचीही माहिती पुढे आली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अमृता रहाटे या एका बॅंकेत सहायक व्यवस्थापक आहेत. काल रात्री त्या बॅंकेतील काम आटपून चांदणी चौकमार्गे चालत घरी निघाल्या होत्या. संजीवन हॉस्पिटलजवळ गेल्यानंतर पाठीमागून एक तरुण दुचाकीवरून आला. तो अमृता यांच्या पुढे भरधाव वेगाने गेला. त्यानंतर लगेच  पुन्हा परत फिरला. त्याने अमृता यांच्या अंगावर राख फेकली. खिशातील टोकदार शस्त्र काढून हल्ला केला. अमृता यांनी हल्ला चुकविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या उजव्या हातावर घाव बसला. त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातून नागरिक जमा झाले. त्यानंतर तो  दुचाकीस्वाराने पळ काढला. अशी पद्धतीची घटना त्याच परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून होत आहे. त्यामुळे पोलिसांसमोरही त्या माथेफिरूला ताब्यात घेण्याचे  आव्हान असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT