corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मुंबई से आया मेरा दोस्त...दोस्त को अब दूरसे सलाम...गावाकडे आल्यावर येतोय अनुभव 

सकाळवृत्तसेवा

लेंगरे (सांगली)- "बम्बई से आया मेरा दोस्त...दोस्त को सलाम करो' हे गाणे अनेकांना परिचित आहे. मुंबईहून गावाकडे आलेल्या तरूणाच्या स्वागतासाठी हे त्याकाळी चित्रपटात गाणे गायले होते. सध्या "कोरोना' च्या काळात अनेक गावात मुंबईला गेलेले सवंगडी परतले आहेत. परंतू कोरोनाच्या भितीने सध्या या गाण्याचे बोल बदलले गेले आहेत. "बंबई से आया मेरा दोस्त...ग्रामपंचायत को इन्फर्म करो' असा बदल केला आहे. पुणे-मुंबईवरुन येणाऱ्या लोकांबद्दल गावाकडील लोकांच्यात चांगलीच धास्ती निर्माण झाली. बाहेरून येणारे "कोरोना' चे संकट घेऊन येत असल्यामुळे प्रशासनावरील ताण चांगलाच वाढला आहे. 


आतापर्यंतचा काळ पाहिला तर मुंबईवरुन आलेल्या दोस्ताला भेटायला गावाकडेच दोस्त मंडळी उत्सुक असायची. मुंबईतून येणाऱ्या दोस्ताकडून तिथल्या घडामोडी ऐकायला उत्सुकता असायची. दोस्त मंडळींमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायची. परंतु सध्या "कोरोना'मुळे मुंबईवरुन येणाऱ्या दोस्तांकडे गावातल्या दोस्तांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुंबईचे दोस्त मात्र माझा गावकडचा दोस्त कधी भेटणार? अशी आशा व्यक्त करताना दिसत आहेत. 


तिसऱ्या लॉकडाउन नंतर शासनाकडून शहरी व ग्रामीण भागातील व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जात आहे. यातच बाहेरुन येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थान समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनावरचा ताण वाढला आहे. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस "क्वारंटाईन' केले जात असले तरी त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आमदार अनिल बाबर यांनी सर्व ग्रामपंचायतीशी "व्हिडीओ कॉन्फरन्स' द्वारे संवाद साधून येणाऱ्या व्यक्तीबाबत भेदभाव न करता योग्य वागणूक द्या असे सांगितले आहे. मात्र अनेक गावातील लोक बाहेरील व्यक्तींकडे संशयानेच बघत आहेत. 


राज्यातून व परराज्यातून स्वगृही परतत असताना काही ठिकाणी चेकपोस्टवरुन सोडण्यासाठी आणि गावी आल्यानंतर संस्थात्मक क्वारंटाईन न करता होम क्वारंटाईन करण्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी ऐकण्यास येत आहेत. या लोकांना गावी येण्यासाठी पन्नास हजार ते एक लाखापर्यत भाडे द्यावे लागत आहे. गावात आल्यानंतरही लुट होत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच गावात आल्यानंतर एरव्ही तत्काळ भेटणारी मंडळ टाळत असल्याचे त्यांना पहायला मिळत आहे. त्यामुळे "बम्बईसे आया मेरा दोस्त' या गाण्याच्या उलट परिस्थिती त्यांना अनुभवास येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT