new delhi
new delhi 
पश्चिम महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या भेटीने 'वाय फॉर डी'ची तरुणाई प्रोत्साहीत 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : वाय फॉर डी संस्थेच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील समाजोपयोगी कार्य करणाऱ्या तरुण व तरुणींना न्यू इंडिया अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कारांचे वितरण झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापुरातील वाय फॉर डी संस्थेच्या सदस्य तरुण-तरुणींची पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. 

दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा कार्यक्रम झाला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. समारोपाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत हा झपाट्याने अर्थव्यवस्तेत प्रगती करत असून कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता व प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यांशी संवाद साधण्याकरिता सोलापुरातील 27 तरुण-तरुणी गेले होते. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने "वाय फॉर डी'च्या तरुण-तरुणींना प्रोत्साहन मिळाले. 

या टीममध्ये प्रा. हिंदुराव गोरे, प्रा.अनिकेत चनशेट्टी, रोहित जाकापुरे, महेश भासगी, प्रा.नितीन बाणेगाव, देविदास गवंडी, प्रतीक भडकुंबे, स्वामीराज बाबर, विघ्नेश माने, उमाकांत गजेली, प्रशांत गाजूल, समर्थ उबाळे, स्नेहा सिंदगी, अफ्रिन शेख, श्रुती मेरगू, प्रज्ञा पाटील, स्नेहा बिराजदार, ओंकार हूंचे, स्नेहल कल्याणशेट्टी, प्रतीक बडोले, महेंद्र राजे, महेश आमले, सतीश आळंद, संगीता कोळी, नवनीत कोंडूर आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT