पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराने नगरपालिकेवर ओढवली नामुष्की

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर - नगराध्यक्ष शहराचा मालक नसून जनतेचा सेवक आहे. त्याने कोणतेही राजकारण न करता जनतेची विकासकामे करायला हवीत, या शब्दात उच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने इस्लामपूर नगराध्यक्षांना खडे बोल सुनावले. इस्लामपूर नगरपालिकेच्या १८३ वर्षाच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराने नगरपालिकेवर नामुष्की ओढवल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, नगरसेवक शहाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 

आम्ही विरोधी नगरसेवकांनी ५७ विषयाची सूची असलेली विशेष सभा घेण्याची मागणी नगराध्यक्ष व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. ती दोघांनीही बेकायदेशीरपणे फेटाळल्याने आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायाधीशांनी दोघांवरही कडक शब्दात ताशेरे ओढल्याने जिल्हाधिकारी यांनी १५ दिवसात विशेष सभा घेण्याची लेखी हमी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.   

राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष आघाडीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाची माहिती राष्ट्रवादी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी दिली.

माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, बी. ए. पाटील, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष,नगरसेवक खंडेराव जाधव, आनंदराव मलगुंडे, संग्राम पाटील, बशीर मुल्ला, सुनीता सपकाळ, जयश्री पाटील, संगीता कांबळे, सदानंद पाटील उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT