jitendra aavhad
jitendra aavhad sakal
पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर : धर्मांधता विकासाचा मार्ग दाखवत नाही;आव्हाड

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : जेम्स लेन आणि बाबासाहेब पुरंदरे यांना अचानक उकरून काढणे, हा रचण्यात आलेला सापळा आहे, जनतेने त्यात अडकू नये. आता तुम्ही उकरून काढलेल्या लेन आणि पुरंदरे यांची हाडे आम्हाला मोजायला लावू नका. धर्मांधता कधीही विकासाचा मार्ग दाखवणार नाही, असा खणखणीत इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे दिला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाच्या इस्लामपूर येथील सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आमदार अमोल मिटकरी, प्रतीक पाटील प्रमुख उपस्थित होते. मंत्री आव्हाड म्हणाले, ‘जयंतराव शांत डोक्याचे राजकारणी आहेत. त्यांच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित आहे.

देशातील महागाई साडे चौदा टक्क्यांवर पोचलीय. ज्या धर्मांधतेकडे आपला देश चाललाय, त्यातून आपला पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. धर्मांधता कधीही विकासाचा मार्ग दाखवणार नाही. बेकारी, बंद होणारे उद्योग, शिक्षणाचे खासगीकरण असे अनेक प्रश्न सतावत आहेत. आम्हाला जेम्स लेन आणि पुरंदरे प्रकरणात पडायचे नाही, मात्र ‘अरे ला का रे’ उत्तर देणे आम्हाला माहिती आहे. आम्ही आता तसेच उत्तर देऊ. बापाला बाप भेटतोच, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आरक्षणाच्या कसल्या गप्पा मारता? नेहरूंनी जे जे पेरले ते यांनी जाळून टाकले आहे. ज्या देशात साधी पिन बनत नव्हती तो देश मिग विमाने बनवतो, हे तुम्ही नाकारू शकत नाही. पुढील तीन महिन्यात पेट्रोल दोनशे रुपये वर जाईल, तुम्ही आम्हाला उपाशी ठेवू नका, उपाशीपोटी क्रांती घडते, आपण या देशातील विचार संपवताय. सगळे बदलले तरी आजही मेंदू आणि रिव्हॉल्व्हर तीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT